![]()
सिडको एन-७ भागातील आंबेडकरनगरमध्ये तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (२९ सप्टेंबर) उघडकीस आली. रेणुका सोनाजी मोकळे (१८, मूळ रा. आडगाव सरक, हर्सूल) असे या तरुणीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, मध्यरात्री तिला एक कॉल आला होता. त्यानंतर सकाळी तिने हे पाऊल उचलले, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. याप्रकरणी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. प्राप्त माहितीनुसार, तरुणीचे शिक्षण आठवीपर्यंत झाले होते. तिचे आई-वडील शेतमजुरी करतात. त्यांना २ मुली व १ मुलगा आहे. मागील काही दिवसांपासून ती आंबेडकरनगर येथे तिच्या आत्याकडे राहायला आली होती. तेथे तिने सकाळी साडेअकराच्या सुमारास घरातील वरच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्याच्या मुलाने तात्काळ शेजारी आणि नातेवाइकांच्या मदतीने तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. मोबाइलच्या तपासात कारण कळेल रात्री अडीचच्या सुमारास तिला मोबाइलवर एक कॉल आला होता, असे नातेवाइकांनी सांगितले आहे. या माहितीच्या आधारे पोलिस आता तिचा मोबाइल ताब्यात घेणार आहेत. सध्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, मोबाइलच्या तपासात माहिती मिळू शकेल, अशी सिडको पोलिसांना अपेक्षा आहे.
Source link
रात्री मोबाइलवर काॅल आला अन् सकाळी तरुणीने गळफास घेतला:छत्रपती संभाजीनगरच्या आंबेडकरनगरमधील घटना; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट