Headlines

नोकरी मागणारे नव्हे, देणारे बना!:अण्णासाहेब पाटील यांच्या 93व्या जयंतीनिमित्त अभिवादन‎




मराठा समाजातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कामगार चळवळीचे नेते स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी दिलेला स्वयंरोजगार व उद्योजकतेचा विचार पुढे नेण्याची गरज आहे. तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून नोकरी देणारे यशस्वी उद्योजक बनावे, असे आवाहन अण्णासाहेब पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. अहिल्यानगर येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा आढावा घेतला. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा समन्वयक परीतोष दरपेल यांनी केली. त्यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत महामंडळाच्या वाटचालीची माहिती दिली. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेतल्यानंतर मराठा समाजातील तरुणांचा शेतीपूरक व्यवसायाकडे कल वाढला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *