Headlines

मन,वचन अन् कायेने झालेल्या चुकांबद्दल सर्वांनी एकमेकांची क्षमा मागितली पाहिजे:मंगळवेढ्यात सकल जैन समाजातर्फे पालखी, राहुल शहा यांचे मार्गदर्शन‎



“पर्युषण पर्व हा आत्मशुद्धीचा पर्व आहे. या दहा दिवसात आपण क्रोध, मान, माया, लोभ यांचा त्याग करून क्षमा, अहिंसा आणि संयमाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. तपस्वी चंद्रजित शहा, सुगंधा शहा व रिशा शहा यांनी केलेली कठोर तपश्चर्या ही संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी

.

या वेळी विजयकुमार नाझरकर, अजित नाझरकर, अरविंद नाझरकर, किरण धोंगडे, प्रवीण शहा, प्रशांत शहा, अनंत नळे, अनंत जैन, श्रीकांत नाझरकर आदी उपस्थित होते. शहरातील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिरापासून या मिरवणुकीस प्रारंभ झाला. पालखीमध्ये भगवान आदिनाथांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. पालखीची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. अहिंसा परमो धर्म की जय! आणि महावीर भगवान की जयच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मार्गात ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करून भाविकांनी स्वागत केले. सुनंदा शहा यांनी जैन तत्त्वज्ञानाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाप्रसादाचे आयोजन नाझरकर-पानगावकर परिवारातर्फे करण्यात आले होते. या वेळी सिद्धांत नाझरकर, प्रतीक नाझरकर, अनिकेत नाझरकर, राहुल धोंगडे, जगदीश रणदिवे, शैलेंद्र पिराळे यांच्यासह सकल जैन समाजबांधव उपस्थित होते.

जवाहर हायस्कूलमध्ये पालखी, पंचामृत अभिषेकाने समाप्ती शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरत ही पालखी मिरवणूक जवाहरलाल शेतकी हायस्कूल येथे पोहोचली. तेथे भगवंतांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मिरवणूक पुन्हा जैन मंदिरात पोहोचल्यावर शांती कलशधारा व भगवंतांची मंगल आरती करून या पर्वाची विधिवत सांगता करण्यात आली. सर्व धार्मिक विधी स्थानिक पंडित प्रशांत उपाध्ये यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *