![]()
माढा कुर्मदास साखर कारखान्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता गाळप क्षमता वाढीबरोबरच उपपदार्थ प्रकल्प असणे काळाची गरज असल्याने येत्या काळात कारखान्याची गाळप क्षमता २५०० मेट्रिक टन करण्याबरोबरच इतर उपपदार्थ निर्मिती करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे वक्तव्य श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे यांनी केले.ते कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत बोलत होते. या वेळी दादासाहेब साठे म्हणाले, येत्या काळात आपण कारखान्याचे २५०० मेट्रिक टन गाळप क्षमतेचे विस्तारीकरण, १४ मेमावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प व प्रतिदिनी पाच मेट्रिक टन क्षमतेचा सीबीजी प्रकल्प हाती घेणार आहोत. त्याची उभारणी लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगम, नवी दिल्ली यांच्याकडे कर्ज प्रस्ताव दाखल केला आहे. दादासाहेब साठे म्हणाले, करतानाच हा कारखाना माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्यामुळे उभा राहिला असून, सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले . या सभेस व्हा. चेअरमन सुधीर पाटील, संचालक भालचंद्र पाटील, हरिदास खताळ, राहुल पाटील, विठ्ठल शिंदे, विजयसिंह पाटील, बाळासाहेब पाटील, मधुकर चव्हाण, शंकर नाईकवाडे आदींसह सभासद, शेतकरी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभासदांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस घालावा कारखान्याने राबवलेल्या स्व. विलासराव देशमुख ऊस विकास कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन ऊस उत्पादन वाढवावे कारखान्याला ऊस घालावा त्याचा फायदा शेतकऱ्यांबरोबरच कारखान्याच्या रिकव्हरी वाढीसाठी होईल. येत्या हंगामात २ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असून, मशिनरी दुरुस्ती अंतिम टप्प्यात आहे आणि तोडणी-वाहतूक करार पूर्ण झाले आहे .
Source link
2500 टन विस्तारीकरणासह वीज व सीबीजी प्रकल्प उभारणी करणार:श्री संत कुर्मदासच्या वार्षिक सभेत साठे यांचा शब्द, दोन लाख टन गाळपाचे उद्दिष्ट