Headlines

मुनीश्रींच्या सान्निध्यामध्ये सकल दिगंबर जैन समाजाच्या शोभायात्रेचे सर्वत्र स्वागत:एकमेकांची क्षमायाचना करत श्रावक-श्राविकांचा मिरवणुकीत सहभाग‎


.

जैन समाजाच्या पर्युषण महापर्वा निमित्त सकल दिगंबर जैन समाजातर्फे दिगंबर जैन समाजाच्या ७ मंदिरांत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

या सर्व कार्यक्रमांची सांगता क्षमावाणी पर्वाने केली. तप, क्षमा, साधना, आत्मकल्याणाच्या या पर्वात श्रावक-श्राविकांनी मुनीश्री १०८ निराकारसागर महाराज, मुनीश्री १०८ निर्माणसागर महाराज, मुनीश्री १०८ उत्साहसागर महाराजांच्या सान्निध्यात शोभायात्रा काढली होती. त्यात क्षमायाचना करत जाणाऱ्या श्रावक-श्राविकांचे पूजा- अर्चना करून स्वागत केले . सर्वप्रथम सकाळी श्री आदिनाथ दिगंबर जैन परवार मंदिरात श्री जींचा अभिषेक, पूजन केले. त्यानंतर श्री जींना पालखीत विराजमान करून ही मिरवणूक सराफा – जवाहर गेट – राजकमल – गांधी चौक – बुधवारा मार्गे होत पुन्हा षटखंडागम भवन येथे पोहोचली. तिथे श्री जींचा अभिषेक, शांतिधारा, आचार्य श्री विद्यासागरजी महाराजांचे पूजन केलेत. या पर्वाचे महत्त्व लक्षात घेता शहराच्या विविध मार्गांवरून पालखीसह मिरवणूक काढली. त्यात श्रावक पांढरे वस्त्र परिधान करून, तर श्राविका लाल रंगाच्या बांधणीच्या साड्या घालून सहभागी झाल्या होत्या. पूज्य मुनि महाराज या मिरवणुकीत सोबत चालणे हा सर्वांसाठी भाग्याचा प्रसंग ठरला. या अद्भुत धार्मिक प्रसंगाचे साक्षीदार बनलेल्या श्रावक-श्राविकांनी एकमेकांची क्षमायाचना करत या मिरवणुकीत सहभाग घेतला. ही मिरवणूक ज्या मार्गावरून जात होती, त्या मार्गावर जैन समाज बांधवांकडून मुनि महाराज व श्रावक-श्राविकांचे पुष्पवृष्टी, पूजा-अर्चना करून स्वागत के ले. भगवंताच्या पालखीत ठेवलेल्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी ईश्वराच्या चरणी क्षमायाचना केली. सृष्टीतील जीवांना क्षमा करून त्यांच्यावर कृपा दृष्टी कायम ठेवावी, अशी प्रार्थना केली. अभिषेकानंतर पर्युषण पर्वात अमरावतीमधील ज्या श्रावकांनी १० दिवस निर्जला उपवास किंवा दिवसातून एकदाच पाणी पिऊन उपवास, ७ दिवस उपवास, ५ दिवस निर्जला उपवास केला, त्यांचा दिगंबर जैन मंदिराच्या ट्रस्टींकडून सत्कार करून अनुमोदना केली व सर्वांना पारितोषिके दिलेत. त्यानंतर क्षमावाणी पर्वावर तिन्ही मुनिराजांचे प्रवचन झाले. सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने या पर्युषण महापर्वाच्या निमित्ताने अंबानगरीचे रूपांतर धर्मनगरीत झाले असल्याचे चित्र दिसत होते. अमरावतीच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व मंदिरांनी एकत्रितपणे क्षमावाणी पर्व साजरे केले.

विशेष म्हणजे शहरात दिगंबर जैन समाजाची विविध दिगंबर जैन मंदिरे आहेत, जिथे दरवर्षी पर्युषण महापर्वाच्या निमित्ताने स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु यावेळी केवळ कार्यक्रमांचे संयुक्त स्वरूप पाहायला मिळाले नाही, तर क्षमावाणी पर्वानिमित्त काढण्यात आलेल्या पालखी व मिरवणुकीत या ७ दिगंबर जैन मंदिरांचा समाज एकत्र येणे हा एक अद्भुत संगम ठरला. यामुळे यंदाचे पर्युषण महापर्व केवळ एक उत्सव राहिला नाही, तर ७ दिगंबर जैन मंदिरांचा संगम, भगवंताच्या पालखीचे नगरभ्रमण आणि पूज्य महाराजांचे स्वतः सोबत चालणे असा ऐतिहासिक त्रिवेणी संगम घेऊन आला. यावेळी जैन श्रावक-श्राविकांची उपस्थिती होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *