![]()
शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीसांचे जुलै महिन्यापासूनचे मानधन थकीत आहे. केवळ २,५०० रुपये मासिक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. थकीत मानधन तातडीने अदा करावे. या मागणीसाठी शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन (आयटक) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. पोषण आहार कर्मचारी दररोज शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक करतात. भांडी घासतात. परिसर स्वच्छ ठेवतात. पिण्याचे पाणी भरतात. धान्याची स्वच्छता राखतात. इतरही विविध कामे करतात. मात्र, तीन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने घरखर्च, मुलांचे शिक्षण, दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. मानधन पी.एम.एस. प्रणालीद्वारे तातडीने अदा करावे. अशी मागणी युनियनने केली आहे. १ ऑक्टोबरपर्यंत मानधन जमा न झाल्यास २ ऑक्टोबर रोजी शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा जिल्हाध्यक्ष हिम्मत गवई यांनी दिला. दरम्यान, जिल्हा सचिव अर्चना भांडवलकर यांनी पोषण आहार कर्मचाऱ्यांची आर्थिक व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडली. थकीत मानधनाच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले. “कर्मचाऱ्यांनी तीन महिने काम करूनही त्यांचा मोबदला मिळत नसेल, तर त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा?” असा सवाल उपस्थित करत मानधन तातडीने देण्याची मागणी त्यांनी केली. १ ऑक्टोबरपर्यंत मानधन जमा झाले नाही, तर २ ऑक्टोबरच्या आंदोलनातून मागे हटणार नाही. असा इशारा युनियनच्या वतीने देण्यात आला आहे. शासनाने तातडीने निर्णय घेऊन पोषण आहार कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन अदा करावे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. असा इशारा गवई व भांडवलकर यांनी दिला. जुलैपासूनच मानधन नाही केवळ २,५०० मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. थकीत मानधन तातडीने अदा करावे; अन्यथा २ ऑक्टोबरला शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
Source link
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन तातडीने अदा करा:शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा देण्यात आला इशारा