![]()
अकोट शहरातील प्रभाग क्रमांक १, ७ आणि ८ ला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन नवीन तहसील कार्यालय ते पोपटखेड रोड परिसरात सहा दिवसांपूर्वी फुटली. याबाबत २३ सप्टेंबर रोजी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. तरी देखील मागील आठवडा उलटून
.
दरम्यान आज पावसाळ्याचे दिवस असतांना देखील अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे पाइपलाइनमधून हजारो लिटर पाणी वायाला जात आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांत आधीच पाणीपुरवठ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी मुख्य पाइपलाइन फुटून पाण्याची नासाडी होत असल्याने नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पाणीपुरवठ्यासाठी ही पाइपलाइन महत्त्वाची आहे. तक्रार वेळेत देऊनही काम सुरू नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. जलस्रोतांवर ताण असताना उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. तरीही अपव्यय थांबत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. देखभाल व दुरुस्ती ही अत्यावश्यक सेवा असतानाही तक्रारीनंतर अनेक दिवस दुरुस्ती होत नसेल, तर जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी ः या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत पाइपलाइनची पाहणी करावी, गळती बंद करत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. तसेच पाइपलाइन फुटल्याची तक्रार मिळाल्यानंतरही दुरुस्तीला विलंब का झाला, याची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही नागरिकांमधून होत आहे. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी शहरातील सर्व मुख्य पाइपलाइनची नियमित तपासणी करा, गळती आढळल्यास तातडीने दुरुस्ती करा आणि नागरिकांच्या तक्रारींसाठी प्रभावी प्रतिसाद यंत्रणा उभारा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. अकोट शहरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी अनेकदा प्रशासनाकडे मागणी केली जाते. काही भागातील नागरिकांना पाणी मिळवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागते. असे असताना मुख्य पाइपलाइन फुटून पाणी रस्त्यावर वाहत राहणे, ही विसंगती नागरिकांच्या संतापात भर घालत आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा असा संदेश देणाऱ्या प्रशासनाने प्रत्यक्षात पाणीगळतीच्या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पाइपलाइन फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पथक पाठवून गळती थांबवणे व कायमस्वरूपी दुरुस्ती करणे अपेक्षित होते. मात्र, विलंबामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे.
एकीकडे पाण्यासाठी वणवण; दुसरीकडे नासाडी
अधिकारी, कंत्राटदरांच्या कार्याची चौकशी करा ^या प्रकाराची तातडीने दखल घेऊन पाइपलाइनची दुरुस्ती करावी. पाण्याचा अपव्यय थांबवावा. तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी. – रेश्मा परवीन अजीम इनामदार, नगरसेविका, अकोट.