Headlines

विद्यार्थी वयोमर्यादा पडताळणीसाठी एक्स-रे करू नये:तपासणी शुल्कातही सवलत देण्याची मागणी; नगरसेवक पराग गवई यांनी दिले निवेदन‎




क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादा पडताळणीसाठी करण्यात येणाऱ्या वैद्यकीय तपासणीत एक्स-रेचा वापर करताना आवश्यक खबरदारी घ्यावी, तसेच शक्य असल्यास सुरक्षित व मान्यताप्राप्त पर्यायी पद्धतीचा अवलंब करावा, अशी मागणी नगरसेवक पराग गवई यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. काही क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची वयोपात्रता निश्चित करण्यासाठी हाडांच्या वयाची तपासणी करण्याकरिता एक्स-रे केला जातो. लहान वयातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत वैद्यकीय गरज नसताना वारंवार एक्स-रे करण्याबाबत पालकांमध्ये चिंता निर्माण होऊ शकते. तपासणी वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असल्यास, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि खबरदारी घेऊन करण्यात यावी, अशी मागणी गवई यांनी केली. वयाची पडताळणी करताना जन्म प्रमाणपत्र, शाळेतील अधिकृत नोंदी व अन्य वैध कागदपत्रांना प्राधान्य द्यावे. शक्य असल्यास एक्स-रेऐवजी सुरक्षित व मान्यताप्राप्त पर्यायी पद्धतीचा विचार करावा, असेही निवेदनात म्हटले आहे. वैद्यकीय तपासणी व एक्स-रेचे शुल्क आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी अडचणीचे ठरू शकते. अशा विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत देण्यासोबतच शासकीय रुग्णालयांमार्फत सवलतीच्या दरात तपासणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांसाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कार्यालयामार्फत विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावे. तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि क्रीडा स्पर्धांमध्ये समान सहभागाची संधी या दोन्ही बाबींचा विचार करून आवश्यक सुधारणा करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी गवई यांनी केली आहे. आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचीही केली मागणी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *