Headlines

अमरावती शिक्षक मतदारसंघात चुरस वाढली:काँग्रेसकडून अदिती पोहरे मैदानात, शिंदे सेनेसह भाजपमध्येही इच्छुकांची गर्दी




विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक ‎‎मतदारसंघाच्या निवडणुकीची सूचना‎ मंगळवारी निवडणूक विभागीय आयुक्तांनी‎ जारी केली. उमेदवारीसाठी महायुती-‎महाविकास आघाडीत (मविआ)‎ कुरघोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. ‎‎मविआमधील घटक पक्ष असलेली काँग्रेस, ‎‎शिवसेना उबाठा आणि महायुतीमधील भाजप‎ व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिंदे ‎‎सेनेत तर आजी-माजी आमदारांमध्ये ‎‎उमेदवारीवरून जुंपण्याचे संकेत प्राप्त झाले‎ असून पक्ष कोणाच्या पारड्यात उमेदवारी ‎टाकते, याकडे लक्ष लागले आहे. अशातच‎ शिक्षक संघटनाही सरसावल्या आहेत.‎ शिक्षक मतदारसंघात अमरावती बरोबरच ‎‎अकोला, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ‎ या जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश होतो.‎सध्या एसआयआरवरून सत्ताधारी व ‎‎विरोधकांमध्ये जंपुली असतानाच विधान ‎‎परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक ‎‎जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून ‎‎निघत आहे. महाविकास आघाडी व ‎‎महायुतीमधील अन्य घटक पक्षांचे नेते ही ‎‎निवडणुकीची तयारी करीत असून या वेळच्या ‎‎निवडणुकीत जिल्ह्यातून काँग्रेसकडून अदिती ‎‎ऋषिकेश पोहरे मैदानात उतरल्या आहेत. त्या ‎‎राकाँचे माजी मंत्री तथा शिवाजी शिक्षण‎संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या‎आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत अकोला‎ जिल्ह्यातील तगडा उमेदवार रिंगणात नव्हता.‎त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत राजकीय ‎घमासान होणार आहे.‎ …तर जागा वाटपावरून होणार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎रस्सीखेच सध्या विधान परिषदेच्या‎ अमरावती व पुणे शिक्षक मतदारसंघ, नागपूर,‎पुणे व छत्रपती संभाजीनगर पदवीधर पदवीधर ‎मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या पाच‎ मतदारसंघातील जागांवरून महायुती-‎महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये‎ रस्सीखेच होत आहे.‎ गेल्या वेळी झाली चौरंगी लढत‎ सन 2020च्या निवडणुकीत सरनाईक यांना 15 ‎हजार 606, देशपांडे यांना 9 हजार 191, भोयर‎ यांना 7 हजार 622 तर शिंदे यांना 4 हजार‎ 862 मते मिळाली होती. हे सर्व जण कायम‎ राहिल्यास निवडणुकीत राजकीय घमासान‎ होणार आहे. त्यामुळे बंडखोरी, प्रत्येकाची‎ वैयक्तिक मतपेटी, मिळणारी ‘रसद’‎(गतवेळी पैठणीचा मुद्दा गाजला होता),‎पक्षाची विचारधारा आणि शिव परिसरातील‎ (श्री शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत कार्यरत‎ शिक्षक) मतदार हे निर्णायक ठरणार‎ असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.‎ अशातच विज्युक्टा, विदर्भ माध्यमिक शिक्षक‎संघ, शिक्षक भारती, शिक्षक आघाडी,‎नुटासह अन्य संघटनांच्या भूमिकेवरही‎ विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.‎ बंडखोरी, वैयक्तिक संपर्क,‎‘रसद’ ठरणार निर्णायक‎ विद्यमान आमदार किरण सरनाईक व माजी‎ आमदार श्रीकांत देशपांडे हे महायुतीचा घटक ‎पक्ष असलेल्या शिंदे सेनेशी निगडीत असून,दोघेही इच्छुक आहेत. अशातच भाजपशी‎ निगडीत संगीता शिंदे व शेखर भोयर ‎यांच्याकडूनही जिल्ह्यातील नेत्यांच्या भेटी‎ घेण्यात येत आहेत.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *