![]()
विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची सूचना मंगळवारी निवडणूक विभागीय आयुक्तांनी जारी केली. उमेदवारीसाठी महायुती-महाविकास आघाडीत (मविआ) कुरघोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. मविआमधील घटक पक्ष असलेली काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि महायुतीमधील भाजप व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिंदे सेनेत तर आजी-माजी आमदारांमध्ये उमेदवारीवरून जुंपण्याचे संकेत प्राप्त झाले असून पक्ष कोणाच्या पारड्यात उमेदवारी टाकते, याकडे लक्ष लागले आहे. अशातच शिक्षक संघटनाही सरसावल्या आहेत. शिक्षक मतदारसंघात अमरावती बरोबरच अकोला, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश होतो.सध्या एसआयआरवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जंपुली असतानाच विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. महाविकास आघाडी व महायुतीमधील अन्य घटक पक्षांचे नेते ही निवडणुकीची तयारी करीत असून या वेळच्या निवडणुकीत जिल्ह्यातून काँग्रेसकडून अदिती ऋषिकेश पोहरे मैदानात उतरल्या आहेत. त्या राकाँचे माजी मंत्री तथा शिवाजी शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्याआहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील तगडा उमेदवार रिंगणात नव्हता.त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत राजकीय घमासान होणार आहे. …तर जागा वाटपावरून होणाररस्सीखेच सध्या विधान परिषदेच्या अमरावती व पुणे शिक्षक मतदारसंघ, नागपूर,पुणे व छत्रपती संभाजीनगर पदवीधर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या पाच मतदारसंघातील जागांवरून महायुती-महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच होत आहे. गेल्या वेळी झाली चौरंगी लढत सन 2020च्या निवडणुकीत सरनाईक यांना 15 हजार 606, देशपांडे यांना 9 हजार 191, भोयर यांना 7 हजार 622 तर शिंदे यांना 4 हजार 862 मते मिळाली होती. हे सर्व जण कायम राहिल्यास निवडणुकीत राजकीय घमासान होणार आहे. त्यामुळे बंडखोरी, प्रत्येकाची वैयक्तिक मतपेटी, मिळणारी ‘रसद’(गतवेळी पैठणीचा मुद्दा गाजला होता),पक्षाची विचारधारा आणि शिव परिसरातील (श्री शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत कार्यरत शिक्षक) मतदार हे निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. अशातच विज्युक्टा, विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघ, शिक्षक भारती, शिक्षक आघाडी,नुटासह अन्य संघटनांच्या भूमिकेवरही विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. बंडखोरी, वैयक्तिक संपर्क,‘रसद’ ठरणार निर्णायक विद्यमान आमदार किरण सरनाईक व माजी आमदार श्रीकांत देशपांडे हे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेशी निगडीत असून,दोघेही इच्छुक आहेत. अशातच भाजपशी निगडीत संगीता शिंदे व शेखर भोयर यांच्याकडूनही जिल्ह्यातील नेत्यांच्या भेटी घेण्यात येत आहेत.
Source link
अमरावती शिक्षक मतदारसंघात चुरस वाढली:काँग्रेसकडून अदिती पोहरे मैदानात, शिंदे सेनेसह भाजपमध्येही इच्छुकांची गर्दी