![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे लोकशाहीचा गळा आवळण्याचे काम करत आहेत. त्यांना आमचा आवाज कायमचा बंद करून शांतता हवी आहे का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, जे लोक काल शिवाजी पार्कवर आले होते, त्यांना त्या पार्कचा इतिहास माहिती नाही, असेही ते म्हणाले. संजय राऊत म्हणाले की, अभिजीत दिपके यांना शिवाजी पार्क परिसरात भाजपने पोसलेल्या लोकांनी विरोध केला. त्यामध्ये एक धर्मेंद्र प्रधान यांचे पीए होते. दिपकेंना विरोध करण्यासाठी जे लोक काल उतरले होते, हे सर्व लोकशाही आणि संविधानविरोधी आहेत. शिवाजी पार्कचा इतिहास माहिती नसणारे लोक काल दिपकेंना तिथे विरोध करायला आले होते. आज त्यांचे जे अस्तित्व आहे, तेसुद्धा याच शिवाजी पार्कमुळे आहे, हे या लोकांना माहिती नाही. ठाणे गुन्हेगारांचा अड्डा बनतंय संजय राऊत म्हणाले की, ठाण्यात प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झाली, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. प्रदीप पूर्णेकर हे ठाण्यातील एक निष्ठावान शिवसैनिक होते. त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ठाणे हे गुन्हेगारांचे अड्डा बनत आहे. गृहखाते आणि ठाण्यातील पोलिस आयुक्त काय करत आहेत? ते मंत्र्यांचे घरगडी आहेत का? गृहखात्याची रेंज ठाण्यात पोहोचत नाही का? असा संतप्त सवाल राऊत यांनी केला. मिनाक्षी शिंदेंच्या कुटुंबियांचा यात संबंध संजय राऊत पुढे म्हणाले की, प्रदीप पूर्णेकर यांचा एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्यासोबत राजकीय संघर्ष सुरू होता. त्यांनी निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये अत्यंत कमी मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्या भागातील बिल्डर लॉबीकडून लोकांना बेघर करण्याचे काम सुरू होते. मनोरमा नगर हा परिसर उठवून तिथे बिल्डरांना वसाहती निर्माण करायच्या होत्या. याशिवाय, ड्रग्स रॅकेटविरोधातही प्रदीप पूर्णेकर यांनी लढा उभारला होता. त्यांचा आवाज लोकांपर्यंत जाऊ नये, म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली. पोलिस आयुक्तांना तात्काळ तिथून हटवा संजय राऊत म्हणाले की, गृहखाते सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, पण ते मोदी-शहा यांच्या छत्रछायेखाली असल्याने त्यांना या घटनेची लाज वाटणार नाही. पोलिस आयुक्तांना तिथून तात्काळ हटवले पाहिजे. पालकमंत्र्यांच्या घरी आयुक्त भांडी घासतात का? गृहमंत्र्यांनी नौटंकी न करता कारवाई करावी आणि केवळ गोळ्या झाडणारेच नव्हे, तर त्यामागील सूत्रधारांनाही अटक केली पाहिजे. दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांच्या नकाशावर ठाणे येत नाही. तुम्ही जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सांभाळू शकत नसाल, तर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. ठाणे माफियांचे शहर ठाणे आज गुंडांचे, ड्रग्ज माफियांचे आणि बिल्डर लॉबीचे शहर झाले आहे. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी तातडीने कारवाई करा, हे सांगण्याची गरज भासू नये. शहराचे पोलिस आयुक्त नेमके कुठे आहेत? असा सवालही राऊतांनी केला. त्यांना कारवाईसाठी ‘नंदनवन’मधून आदेश घ्यावा लागतो का? मिनाक्षी शिंदे यांचे कुटुंब आणि त्यांचे गुंड यामागे आहेत, याचे पुरावे आमच्या पदाधिकाऱ्यांकडे आहेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले. हे ही वृत्त वाचा मतदारांना सुनावणीसाठी बोलावू नका; व्हॉट्सॲप, ई-मेलवरील पुरावे ग्राह्य धरा!:मतदार यादी पडताळणीवरून मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे कडक निर्देश राज्यात मतदार यादी विशेष सघन पुनरीक्षण (SIR) मोहिमेवरून राजकीय आणि प्रशासकीय वातावरण तापले असताना, मतदारांना कोणताही मनस्ताप होऊ नये यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण व दिलासादायक पाऊल उचलले आहे. “मतदार यादीच्या पडताळणी किंवा दुरुस्ती प्रक्रियेत नागरिकांना कार्यालयात सुनावणीसाठी बोलावण्याची किंवा अधिकाऱ्यांनी वारंवार त्यांच्या घरी खेटे मारण्याची अजिबात गरज नाही. नागरिकांनी व्हॉट्सॲप अथवा ई-मेलद्वारे पाठवलेली कागदपत्रे आणि पुरावे ग्राह्य धरून तातडीने पुढील प्रक्रिया पूर्ण करावी,” असे स्पष्ट व थेट आदेश मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व निवडणूक यंत्रणेला दिले आहेत. वाचा सविस्तर
Source link
नरेंद्र मोदी, अमित शहा-देवेंद्र फडणवीस लोकशाहीचा गळा आवळत आहेत:पूर्णेकर यांच्या हत्तेमागील सूत्रधारांना अटक करा- संजय राऊत