Headlines

मराठवाड्यातील धरणांवर फ्लोटिंग सोलार प्रकल्प उभारणार:जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची घोषणा, लवकरच निविदा काढणार




मराठवाड्यातील सात ते आठ धरणांवर फ्लोटिंग आणि लँड सोलार प्रकल्प उभारले जातील. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळातर्फे हे प्रकल्प राबवले जातील. यासाठी लवकरच निविदा काढल्या जातील, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी (३० ऑगस्ट) दिली. विखे-पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा घेतला. सध्या धरणांमध्ये फक्त १० ते १२ टक्के पाणीसाठा आहे. अधिकाऱ्यांना ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीसाठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाईल, तसेच जायकवाडीतून रब्बी पिकांना पाणी मिळेल. निधीअभावी रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कार्यक्रम आखला आहे. नाबार्डच्या टप्पा १ व २ अंतर्गत १५ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. यातून २०२८ पर्यंत मराठवाड्यातील काही प्रकल्प पूर्ण होतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *