![]()
अमरावतीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. लोकशाही व मतदानाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी हे आंदोलन होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत निवडणूक आयोगाच्
.
निवडणूक आयोगातील दोन आयुक्त, सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी, यांनी गेल्या दहा महिन्यांत किमान १४ वेळा विविध निर्णयांवर लेखी आक्षेप नोंदवले आहेत. यात मतदारांची नावे समाविष्ट करणे/वगळणे, फॉर्म सहामधील बदल आणि डेटाबेस एकत्रीकरण यांसारख्या बाबींचा समावेश आहे. हे निर्णय भाजपच्या राजकीय फायद्यासाठी घेतल्याचा आरोप करत, ज्ञानेश कुमार यांना नैतिक अधिकार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले. आक्षेपांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणीही त्यांनी केली.
या आंदोलनात सुनील मेटकर, सुभाष पांडे, रमेश सोनुले, प्रा. विजय रोडगे, प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे, प्रा. साहेबराव विधळे, एम.वाय. शहाणे, विजय मंडवधरे, जे. एम. कोठारी, सागर दुर्योधन, संजय मंडवधरे, लता सोनारकर, जया मंडवधरे, विजय चौधरी, मनोहर वाढोणकर यांच्यासह डाव्या आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.