![]()
मोर्शी येथे अतिक्रमण काढण्याच्या कारवाईदरम्यान भिंत कोसळल्याने दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यांनी एका दुकानदाराला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ही घटना घडली. जखमी पोलिसांची नावे समीर चौधरी आणि गोपाल घाटे अशी आहेत. एकाच्या डोक्याला, तर दुसऱ्याच्या कमरेला मार लागला आहे. ही घटना बुधवार, ३० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता मोर्शी ते चांदूरबाजार रोडवरील एका स्वीट मार्टच्या दुकानात घडली. घटनेनंतर दोन्ही पोलिसांना तात्काळ मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांनी त्यांच्यावर उपचार केले. सध्या दोन्ही कर्मचाऱ्यांची तब्येत स्थिर आहे. सुरेश हलवादिया यांच्या मालकीच्या स्वीट मार्टच्या दुकानाची भिंत बुलडोझरने पाडताना कोसळली. प्रशासनाने मोर्शी वरुड तालुका अति दुष्काळग्रस्त घोषित केला असतानाही, रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली व्यापाऱ्यांवर कारवाई केल्याने असंतोष आहे.
Source link
अतिक्रमण काढताना भिंत कोसळली, दोन पोलिस जखमी:दुकानदाराला वाचवताना घडली घटना; मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु