Headlines

मंदिरातून 2 लाख 20 हजारांचा मुकुट लंपास:गणेशपूर येथील घटना, पिशोर पोलिसांत गुन्हा‎




गणेशपूर येथील प्रसिद्ध गणपती मंदिरात मध्यरात्री अज्ञात चोरट्याने प्रवेश करून गणपती मूर्तीवरील चांदीचे मुकुट लांबवल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. या चोरीत २ लाख २० हजार रुपये किमतीचा चांदीचा ऐवज लंपास झाला आहे. २९ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते ३० सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि गणपतीच्या मूर्तीवरील दागिने चोरून पसार झाला. चोरी गेलेल्या साहित्यामध्ये २ लाख रुपये किमतीचा २ किलो २५० ग्रॅम वजनाचा गोलाकार चांदीचा मुकुट आणि २० हजार रुपये किमतीचा २५० ग्रॅम वजनाचा मोदक आकाराचा चांदीचा मुकुट समाविष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत श्वानपथकाला पाचारण केले होते. या प्रकरणी गणेशपूर येथील रहिवासी जुलाललिंग सुरसिंग राजपूत यांच्या फिर्यादीवरून पिशोर ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपासाला वेग दिला असून, सीसीटीव्ही तपासणी करण्यात येत आहे. तपास पोलिस नाईक बरडे करत आहेत. दरम्यान, २५ वर्षांपूर्वी एका भाविकाने मंदिरास मुकुट दान स्वरूपात दिला असल्याचे सांगण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *