![]()
ध्वनीप्रदूषणाबाबत भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांनी धार्मिक भावना दुखाविल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नगरसेवक गणेश कल्याणकर यांनी केली आहे. कल्याणकर यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. ‘बापट यांनी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्ते, तसेच धार्मिक सण, उत्सवांवर टीका केली. बापट यांचे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे आहे, तसेच धार्मिक भावना दुखाविणारे आहे. बापट यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखाविल्या असून, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी कल्याणकर यांनी केली आहे. कल्याणकर यांनी याबाबत खडक पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. ‘बापट यांनी विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना कार्यकर्त्यांवर टीका केली. बापट यांच्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखाविल्या आहेत. कार्यकर्तो म्हणून मी पोलिसांकडे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत तक्रार अर्ज दिला आहे’, असे कल्याणकर यांनी नमूद केले. दरम्यान, कार्यकर्ते राहुल देखणे यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. धार्मिक भावना दुखाविल्या प्रकरणी बापट यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. नऱ्हेत घरफोडी; रोकड लंपास, शॉर्टसर्किटने सामान जळाले नऱ्हे येथील बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कोयंडा तोडून चोरट्याने दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली. याच फ्लॅटमध्ये लाईट लावल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन स्वयंपाकघरातील उपकरणे, भांडी आणि कपडे जळाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अथर्व जितेंद्र महाडीक (वय 25, रा. फ्लॅट क्रमांक 101, चंदन हाईट्स, श्री कंट्रोल चौकाजवळ, नऱ्हे,) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 27 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ या कालावधीत महाडीक यांच्या राहत्या फ्लॅटमध्ये चोरी झाली. चोरट्याने दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून दहा हजार रुपयांची रोकड चोरून नेली. अहवालानुसार, घरातील लाईट लावल्यामुळे शॉर्टसर्किट झाले. त्यात किचनमधील फ्रिज, हिटर, मिक्सर, प्लास्टिकची भांडी आणि कपडे जळून नुकसान झाले. चोरीसह घरातील वस्तू जळाल्याचा तपशीलही फिर्यादीत नमूद आहे.
Source link
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी विद्यानंद बापटांवर गुन्हा दाखल करा:राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश कल्याणकर यांची मागणी