केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वादग्रस्त कारभाराविरोधात, मतदार याद्यांमधील कथित ‘एसआयआर’ (SIR) घोटाळ्यावरून मुंबईत पुकारण्यात आलेल्या आंदोलनांना आता महाविकास आघाडीतील बड्या राजकीय पक्षांचे मोठे बळ मिळताना दिसत आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) प्रमुख अभिजी
.
या घोषणेमुळे उद्याच्या आंदोलनापूर्वी अभिजीत दीपके आणि त्यांच्या युवा समर्थकांचे राजकीय वजन लक्षणीयरीत्या वाढले आहे. केवळ 2 ऑक्टोबरच्याच नव्हे, तर 4 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पुढाकाराने मुंबईत निघणाऱ्या विराट महामोर्चालाही शरद पवार यांच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी जाहीर केले.
सुप्रिया सुळे यांची घोषणा, लोकशाहीच्या रक्षणासाठी पाठिंबा
नवी दिल्लीतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात आणि देशातील लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी उद्या 2 ऑक्टोबर रोजी अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ‘जेल भरो’ आंदोलन होत आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. तसेच, येत्या 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंच्या (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) नेतृत्वाखाली मुंबईत जो भव्य मोर्चा निघणार आहे, त्या मोर्चालाही आमचा पाठिंबा असेल.”
दरम्यान, दोन्ही आंदोलनांना पक्षाचा नैतिक व राजकीय पाठिंबा असला, तरी शरद पवार किंवा पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वतः या आंदोलनांच्या मंचावर प्रत्यक्ष सहभागी होणार का, याबाबतची अधिकृत रणनीती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
ठाकरे बंधू आणि काँग्रेस पाठोपाठ पवारांची साथ; विरोधकांची एकजूट
निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात विरोधकांनी एकामागोमाग एक आंदोलनांची मालिका उभी केली आहे. ‘शिवतीर्थ’वरील संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते की, 2 ऑक्टोबरच्या आंदोलनाला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. यापूर्वी जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनालाही शिवसेनेने पाठिंबा दिला होता. तर राज ठाकरे यांनीही, “हा स्पर्धेचा विषय नसून लोकशाहीसाठी जो कोणी रस्त्यावर उतरेल, त्याला आमचा पाठिंबा राहील,” असे स्पष्ट केले होते.
काँग्रेसची सक्रिय भूमिका
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आधीच जाहीर केले आहे की, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार असून, 4 ऑक्टोबरच्या ठाकरे बंधूंच्या महामोर्चातही काँग्रेसचे नेते-कार्यकर्ते सक्रिय सहभागी होतील. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिल्याने विरोधकांची भक्कम एकजूट स्पष्ट झाली आहे.
उद्या शिवाजी पार्कात तरुणांचा जमाव; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
अभिजीत दीपके यांनी पुकारलेल्या या ‘जेल भरो’ आंदोलनात राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर ‘जेन-झी’ (Gen-Z) म्हणजेच तरुण मतदार आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दादरचा शिवाजी पार्क परिसर ‘सायलेंट झोन’ असल्याने आणि स्थानिकांकडून तसेच काही संघटनांकडून आंदोलनाला विरोध होत असल्याने मुंबई पोलिसांवर मोठा ताण आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी दादर आणि शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दुसरीकडे महायुतीची खलबते: पदवीधर-शिक्षक निवडणुका एकत्र लढणार
एकीकडे विरोधक निवडणूक आयोगाविरोधात एकत्र येत असतानाच, दुसरीकडे महायुतीमध्येही रात्री उशिरा महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या आगामी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांना भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष ‘महायुती’ म्हणून एकजुटीने सामोरे जाणार असून, जागावाटपावर तिन्ही प्रमुख नेत्यांचे एकमत झाल्याचे समजते. उद्याच्या 2 ऑक्टोबरच्या अभिजीत दिपकेंच्या ‘जेल भरो’ आंदोलनाकडे आणि त्यानंतर 4 ऑक्टोबरला भायखळा ते महापालिका मुख्यालयादरम्यान निघणाऱ्या ठाकरे बंधूंच्या महामोर्चाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
————————-
हेही वाचा…
ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा: नाना पटोले म्हणाले – लोकशाही वाचवण्यासाठी आम्हीही रस्त्यावर उतरणार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात देशभरातील विरोधी पक्षांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठे आंदोलन पुकारण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी या मोर्चासाठी इतर विरोधी पक्षांनाही सोबत येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने या आंदोलनात सहभागी होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी