Headlines

25लाखांच्या कर्जावर वार्षिक 5,250 जास्त व्याज, ठेवीवर 10हजार कमी कमाई:5 महिन्यांत कर्जाचा व्याजदर 0.21% वाढला, ठेवीवरील व्याज 0.40% घटले



रिझर्व्ह बँकेने अलीकडच्या काही महिन्यांत रेपो रेट वाढवला नाही, तरीही बँकांकडून नवीन कर्ज घेणे महाग होऊ लागले आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, बँकांच्या नव्या कर्जाचा सरासरी व्याजदर मार्चमध्ये ८.४०% होता, तो ऑगस्टमध्ये वाढून ८.६१% झाला आहे.

.

म्हणजेच पाच महिन्यांत ०.२१ टक्के अंकांची वाढ झाली आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर २५ लाख रुपयांच्या नवीन कर्जावर ०.२१% चा फरक वार्षिक ₹५,२५० एवढा होतो. दुसरीकडे बँकेत नवीन मुदत ठेव ठेवणाऱ्यांना मिळणारा सरासरी व्याजदर याच काळात ६.०७% वरून घसरून ५.६७% राहिला आहे. म्हणजेच २५ लाख रुपयांच्या ठेवीवर वार्षिक व्याज ₹१०,००० कमी मिळेल.

खाजगी बँकांत कर्ज ९.१९%, सरकारी बँकांमध्ये ७.९९%

ऑगस्टमध्ये सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही बँकांनी नव्या ठेवींवरील व्याज कमी केले. सरकारी बँकांमध्ये दर १५ बेसिस पॉइंट्सने घसरून ६.२०% आणि खाजगी बँकांमध्ये १४ बेसिस पॉइंट्सने घसरून ५.८२% राहिला. याउलट नवीन कर्जाचा सरासरी दर खाजगी बँकांमध्ये १० बेसिस पॉइंट्सने वाढून ९.१९% झाला. सरकारी बँकांमध्ये तो केवळ १ बेसिस पॉइंटने वाढून ७.९९% राहिला. म्हणजेच ऑगस्टमध्ये नव्या कर्जाच्या दरांमध्ये झालेली वाढ मुख्यत्वे खाजगी बँकांमध्ये झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *