Headlines

गंगापूर खरेदीविक्री संघाला अशोक पाटील डोणगावकर यांचे नाव देण्याचा ठराव:गंगापूर तालुका सहकारी खरेदीविक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात‎



गंगापूर तालुका सहकारी खरेदीविक्री संघाची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (३० सप्टेंबर) संस्थेच्या मुख्य कार्यालयात अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत गंगापूर तालुका सहकारी खरेदीविक्री संघास महाराष्ट्राचे माजी मंत्री स्व

.

सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे सभापती बद्रीनाथ भानुदास पाटील बाराहाते होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

सुमारे १३० सभासदांनी खरेदीविक्री संघास स्वर्गीय अशोक पाटील डोणगावकर यांचे नाव देण्याबाबत लेखी सूचना व अर्ज सादर केले होते. त्यानुसार सभासद ज्ञानेश्वर भानुदास वाघचौरे यांनी नामांतराचा अधिकृत ठराव मांडला, तर बबनराव जगन्नाथ म्हस्के यांनी त्यास अनुमोदन दिले. उपस्थित सभासदांनी या ठरावाला एकमुखाने मंजुरी दिली. यासोबतच शेतकऱ्यांच्या हिताचे विविध महत्त्वपूर्ण ठरावही या वेळी संमत करण्यात आले.

या सभेस उपसभापती कृष्णा मुरलीधर ऐडके, संचालक लक्ष्मण भुसारे, सुभाष धोत्रे, भाऊसाहेब बाराहाते, राजाभाऊ दंडे, ज्ञानेश्वर म्हस्के, राम धोत्रे, जनार्दन चनघटे, नाना जगताप, सारंगधर जाधव, बालचंद जाधव, निर्मलाबाई बोडखे, ज्योती कानडे, नारायण सोलंकर यांच्यासह सोपानराव देशमुख, भागवतराव काळे, नाना सोनवणे, सूर्यकांत गरड व सभासद उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *