Headlines

वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर भाविकांसाठी खुलेच राहणार- जिल्हाधिकारी गौडा‎:1 नोव्हेंबरपासून मंदिर बंद ही अफवा, भाविकांच्या हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था




12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री‎क्षेत्र वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर ‎आगामी 1 नोव्हेंबरपासून दर्शनासाठी ‎बंद होणार, अशी अफवा पसरली‎ होती. यामुळे देशभरातील लाखो भाविकांमध्ये संभ्रम आणि स्थानिक ‎व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण‎ होते. मात्र, गुरुवारी (1 ऑक्टोबर)‎ जिल्हाधिकारी कार्यालयात पार ‎पडलेल्या बैठकीत ‘1 नोव्हेंबरपासून‎ मंदिर बंद राहणार नाही” असे ‎आश्वासन जिल्हाधिकारी विनय गौडा ‎यांनी दिले. कुंभमेळ्याच्या‎ पार्श्वभूमीवर वेरूळ गावातील अवजड ‎वाहतूक पुढील सहा महिन्यांसाठी‎ वळवली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.‎ वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर‎परिसरात 210 कोटी रुपये खर्चून ‎विकासकामे केली जात आहेत.‎ यामध्ये मंदिर परिसरात भव्य प्रवेशद्वार,‎ दर्शन रांगेची व्यवस्था, ध्यान केंद्र‎ (मेडिटेशन सेंटर), जुन्या तीर्थक्षेत्रांचे ‎पुनरुज्जीवन, फूड कोर्ट, सीसीटीव्ही‎ यंत्रणा, भगवान शंकराची भव्य मूर्ती, ‎संग्रहालय आणि लेझर‎लाईट-अँड-साऊंड शो यांसारखी कामे ‎सुरु आहेत. या कामाचा आढावा ‎घेण्यासाठी 30 सप्टेंबर रोजी ‎प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत ‎स्थानिकांना विश्वासात न घेता मंदिर‎ बंद करण्याचा निर्णय घेण्यात ‎आल्याची अफवा पसरल्याने, ग्रामस्थ‎ व दुकानदारांनी गुरुवारी थेट‎ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.‎ यावेळी भविष्यात या विकासकामांमुळे ‎काही काळासाठी मंदिर बंद ठेवण्याची ‎वेळ आल्यास, थेट निर्णय न घेता‎ स्थानिक ग्रामस्थ, दुकानदार आणि‎ देवस्थान ट्रस्टला विश्वासात घेतले‎ जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी ‎दिली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ‎कुणाल दांडगे, श्री घृष्णेश्वर दुकानदार‎ असोसिएशनचे अध्यक्ष गणेश हजारी,‎वेरूळ लेणी दुकानदार संघटनेचे‎अध्यक्ष मकरंद आपटे यांच्यासह ‎गोपाल गिरी किपाटी, विजय भालेराव,‎ मिलिंद शेवाळे, प्रकाश पाटील, जितेंद्र ‎हजारी, बाळू ठाकरे आदींची उपस्थिती ‎होती.‎ तोडगा काढण्याचे आश्वासन‎ जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर परिसरातील स्थानिक‎लोकांच्या रोजगाराचा प्रश्नही समजून घेतला.‎सर्वसमावेशक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने‎आम्ही समाधानी आहोत. – गणेश हजारी, अध्यक्ष,‎घृष्णेश्वर दुकानदार असोसिएशन‎ सकारात्मक चर्चा, रोजगाराचाही विचार‎ जिल्हाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून, 1‎नोव्हेंबरला मंदिर बंद होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.‎त्यामुळे भाविकांनी संभ्रमात राहू नये, असे देवस्थान ट्रस्टचे‎अध्यक्ष कुणाल दांडगे यांनी सांगितले. मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय नाही‎ मंदिर बंद ठेवण्याबाबतचा‎‎कोणताही निर्णय झालेला नाही.‎‎कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर‎‎विकासकामांदरम्यान मंदिर बंद‎‎करण्याबाबत काही निर्णय‎‎झाल्यास त्याबाबत अगोदरच‎कळवण्यात येईल. – विनय गौडा, जिल्हाधिकारी‎ 29 मार्च 2027 पर्यंत वाहतूक वळवली‎ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात ‎विकासकामे वेगाने सुरू आहेत. भाविकांना रस्ता ओलांडताना ‎सुरक्षितता मिळावी यासाठी राज्य मार्ग क्र. 216 ला छेदून‎ अंडरपास (भुयारी मार्ग) बांधला जात आहे. या मोठ्या‎ उत्खननामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव, या मार्गावरील सर्व‎जड वाहतूक 29 सप्टेंबर 2026 ते 29 मार्च 2027 (सहा महिने)‎ पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश प्रभारी पोलिस अधीक्षक प्रशांत‎ स्वामी यांनी दिले आहेत.‎ असा असेल पर्यायी वाहतूक मार्ग कन्नडकडून येणारी वाहने कन्नड ते‎वेरूळ-खुलताबाद-दौलताबादमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे‎ येणारी जड वाहने आता कसाबखेडा फाटा – वरझडी –‎माळीवाडा – शरणापूर फाटामार्गे संभाजीनगरकडे जातील.‎ फुलंब्रीकडून जाणारी वाहने फुलंब्री-खुलताबाद-वे‎रूळमार्गे कन्नड व चाळीसगावकडे जाणारी वाहने छत्रपती ‎संभाजीनगर – शरणापूर फाटा – माळीवाडा – वरझडी –‎कसाबखेडा फाटा – वेरूळमार्गे कन्नड व चाळीसगावकडे‎ जातील.‎ चाळीसगावकडून येणारी वाहने कन्नड व‎चाळीसगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहने ‎कन्नड – वेरूळ – कसाबखेडा फाटा – वरझडी –‎माळीवाडा – शरणापूर फाटामार्गे छत्रपती संभाजीनगरकडे ‎वळवण्यात आली आहेत.‎
‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *