Headlines

फुलंब्री‎:गिरसावळीतील शेतकऱ्याचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू




निसर्गाची वक्रदृष्टी आणि डोक्यावर वाढणारा कर्जाचा डोंगर यामुळे त्रस्त एका शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे. घाटी रुग्णालयात १५ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. विष्णू विठ्ठल गाडेकर (४४, रा. गिरसावळी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. चालू हंगामात पिकांतून चांगले उत्पन्न मिळेल या आशेने त्यांनी सोसायटी, सावकारी कर्ज आणि बी-बियाणे उधार घेतले होते. पाऊस न पडल्याने हातातोंडाशी आलेले पीक करपून गेले. यामुळे ते तणावात होते. याच उद्विग्नतेतून १७ सप्टेंबर रात्री त्यांनी राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. नातेवाइकांनी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे १५ दिवस उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. फुलंब्री पोलिसात नोंद करण्यात आली असून, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *