Headlines

आमठाण्यात दुष्काळी पंचनाम्यांना सुरुवात:त्रिस्तरीय समिती बांधावर




आमठाणा व परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्या त्रिस्तरीय समितीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली जात आहे. सध्या तलाठी विशाल पाटील व ग्रामविकास अधिकारी बंसिधर पडूळकर यांच्यासह समितीतील संबंधित अधिकारी शेतावर जाऊन दुष्काळामुळे पिकांवर झालेल्या परिणामांची आणि नुकसानीची अचूक नोंद पंचनाम्याद्वारे करत आहेत. पावसाअभावी झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती संकलित केली जात आहे. ही प्रक्रिया सुरळीत व वेळेत पूर्ण होण्यासाठी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी त्रिस्तरीय समितीला सहकार्य करावे. तसेच पंचनाम्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नियमानुसार मदत मिळण्यासाठी हे पंचनामे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व शेतकऱ्यांनी कागदपत्रांसह अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचनामे करून घ्यावेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *