![]()
गुरुमाऊली संत अच्युत महाराजांना शनिवारी श्री क्षेत्र शेंदुरजनाबाजार येथील महासमाधीस्थळी हजारो भाविकांनी मौन श्रद्धांजली वाहिली. ३ ऑक्टोबर रोजी महाराजांचे देहावसान झाले होते. या दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी श्रद्धांजली कार्यक्रम होतो. यावेळी अभिनेते भारत गणेशपुरे आणि गायक रघुनाथ कर्डीकर उपस्थित होते. कर्डीकर यांच्या भक्तीमय गीतांनी वातावरण भावविभोर झाले. कार्यक्रमानंतर महाराजांची आरती आणि सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. पद्मश्री जनार्दनपंत बोथे गुरुजी, आमदार राजेश वानखडे, डॉ. अनिल सावरकर, संत सचिनदेव महाराज, संत सयाजी महाराज, अशोकानंद कवर महाराज, जगद्गुरू रामराजेश्वर माऊली, कनेरकर महाराज, सुधीर दिवे, गोपाल कडू, अनंत धर्माळे आदी मान्यवर उपस्थित होते. ‘संतबोध’ पुस्तकाचे विमोचनही झाले. अभिनेते भारत गणेशपुरे यांनी संतांच्या विचारांवर कार्य करण्याचे आवाहन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांसारख्या संतांनी समाजासाठी मोठे काम केले. अंधश्रद्धा टाळून ग्रामगीतेतील विचार आचरणात आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
Source link
शेंदुरजनाबाजार येथे संत अच्युत महाराजांना हजारो भाविकांनी वाहिली श्रद्धांजली:अभिनेते भारत गणेशपुरे, गायक रघुनाथ कर्डीकर उपस्थित; 'संतबोध' पुस्तकाचे विमोचन झाले.