Headlines

अमरावती जिल्हा बँकेच्या प्रशासक नियुक्तीचा निकाल:संचालकांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश उद्या, 5 ऑक्टोबरला येणार




अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार की प्रशासक नेमला जाणार, याचा निर्णय उद्या, ५ ऑक्टोबरला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली आहे. बँकेच्या विद्यमान संचालकांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबरला संपत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधील वादामुळे वेळेत निवडणूक होऊ शकली नाही. सत्ताधारी संचालकांनी नवीन मंडळ येईपर्यंत मुदतवाढ मागितली आहे. तर विरोधी संचालकांनी सहकार कायद्यानुसार प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. ज्येष्ठ विधीज्ञ भांगडे यांनी सत्ताधाऱ्यांची बाजू मांडली, तर ॲड. परवेझ मिर्झा यांनी विरोधकांची बाजू भक्कमपणे मांडली. सरकारच्यावतीने राज्याच्या महाधिवक्तांनी सहकार विभागातील तरतुदी स्पष्ट केल्या. आता सोमवारी न्यायालय काय आदेश देते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *