Headlines

शिक्षकांना मतदानासाठी भर पगारी रजा जाहीर:अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 23ऑक्टोबरला मतदान




अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदान करणाऱ्या शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विशेष भर पगारी रजा जाहीर करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर रोजी अमरावती आणि पुणे येथील शिक्षक तसेच औरंगाबाद, पुणे व नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ बी आणि २३ जून १९९१ च्या शासन निर्णयानुसार ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना ही विशेष रजा लागू नाही. अशा मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगाने दोन तासांची विशेष सवलत दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *