Headlines

47 हजारांवर महिला शेतकऱ्यांची नोंदणी:अक्कलकोट आघाडीवर तर इतर तालुक्यात दिसला निरुत्साह‎




शेतात राबणाऱ्या कष्टकरी महिलांच्या हाताला आता अधिकृत ओळख मिळणार आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या महिला सक्षमीकरण धोरण व अधिनियमानुसार आता महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अधिकृत पोर्टलवर अर्ज सादर केल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत हे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. या प्रमाणपत्रामुळे महिला शेतकऱ्यांना पीक कर्ज, विमा, कृषी निविष्ठा आणि कृषी विभागाच्या विस्तार योजनांमध्ये प्राधान्याने लाभ दिला जाईल. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात तब्बल ११ हजार ७६३ महिलांनी यासाठी नोंदणी केली आहे. प्रत्यक्ष शेतीकाम करणाऱ्या महिलांबरोबरच शेतीपूरक व्यवसायात कार्यरत असलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. १. अधिकृत पोर्टलच्या लिंकवर क्लिक करून संकेतस्थळ उघडा. २. पात्रता तपासा व अर्ज सादर करा. ३. नाव, आधार , मोबाईल नंबर आणि पत्ता यासह वैयक्तिक माहिती भरा. ४. शेती किंवा शेतीपूरक कामाचा प्रकार निवडा. ५. माहितीची पडताळणी करून अर्ज सबमिट करा व ॲप्लिकेशन आयडी जतन करा. ६. या आयडीद्वारे पोर्टलवर अर्जाची सद्यस्थितीही तपासता येईल. ^महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळण्यासाठी गावोगावी व्यापक जनजागृती केली जात आहे. पात्र महिलांनी ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करताना काही अडचण आल्यास संबंधित गावातील कृषी सहाय्यकांची मदत घ्यावी. शुक्राचार्य भोसले, जिल्हा कृषी अधिकारी एआय इमेज शासनाच्या अधिकृत पोर्टलवर करा नोंदणी शेतीसंबंधित व्यवसाय गांडूळ खत व जैविक निविष्ठा निर्मिती करणाऱ्या महिला वनोपज संकलन व विक्री, भाजीपाला आणि फळबाग लागवड करणाऱ्या महिला दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग आणि मधुमक्षिका पालन करणाऱ्या महिला किंवा स्थलांतरित शेतीशी संबंधित महिला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *