![]()
सकल अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत छत्रपती महाराजा श्री अग्रसेन यांच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ ते ११ ऑक्टोबरदरम्यान विविध सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, मनोरंजनात्मक उपक्रम राबवले जाणार आहेत. ही माहिती अग्रवाल समितीच्या वतीने स्थानिक अग्रसेन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला अग्रवाल समितीचे अध्यक्ष महेंद्र खेतान, उपाध्यक्ष संतोष अग्रवाल, ओम साव, पुरुषोत्तम गुप्ता, सचिव विनोद अग्रवाल, अग्रसेन भवन ट्रस्टचे अध्यक्ष गिरीश अग्रवाल, ट्रस्टचे सचिव शैलेंद्र कागलीवाल, महिला मंडळाच्या अध्यक्षा मीना बाजोरिया, सचिव सीमा साव, नवयुवक मंडळाचे अध्यक्ष अॅड. केशव अग्रवाल, सचिव धवल अग्रवाल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाचा मुख्य जयंती सोहळा रविवारी (दि. ११) सायंकाळी ६.३० वाजता पोलिस लॉन येथे रंगणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक पवन सराफ उपस्थित राहणार आहेत. संभाजीनगर येथील उद्योजक व समाजसेवक डॉ. सुशील भारुका उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी दुपारी ३.३० वाजता स्थानिक राणी सती धाम येथून आकर्षक झाँक्या व विविध देखाव्यांसह महाराजा अग्रसेन यांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक गांधी चौक, सिटी कोतवाली, टिळक रोड, जुना कापड बाजार, सराफ बाजार, गांधी चौक, तहसील चौक मार्गे अग्रसेन भवन येथे पोहोचेल. त्यानंतर पोलिस लॉनवर मुख्य सोहळा संपन्न होईल. कार्यक्रमाच्या नियोजनात व पत्रकार परिषदेत कोषाध्यक्ष मोहन अग्रवाल, सहकोषाध्यक्ष जगदीश झुनझुनवाला, सहसचिव प्रा. विजय अग्रवाल, पवन बाछूका, हिशोबनीस पवन अग्रवाल, भवन अधिकारी संजय टिकूपोते, महावीर गाडोदिया, कार्यकारिणी सदस्य दीपक गोयनका, आशिष चौधरी, प्रदीप गोयनका, पुरुषोत्तम अग्रवाल, संतोष अग्रवाल (खडकी), गिरधर अग्रवाल, मनोज जाजोदिया, निहार अग्रवाल, अरुण अग्रवाल, अजय अग्रवाल, श्याम पोद्दार, गोविंद खेतान, गोपाल अग्रवाल, अनिरुद्ध चंगोईवाला, रोशन अग्रवाल, रोहित रुंगटा, अंकित अग्रवाल, दीपक अग्रवाल, अमित सराफ, अभिजित गोयनका, आनंद अग्रवाल, भवन व्यवस्थापक गणेश अग्रवाल, महिला मंडळाच्या उपाध्यक्षा मनीषा पाडिया, ममता खेतान, नीता लोहिया, प्रमिला अग्रवाल, सोनल अग्रवाल, दर्शना गोयनका, शीतल गर्ग, अंजली साव, नीता बाजोरिया यांच्यासह अग्रवाल समिती, अग्रसेन भवन ट्रस्ट, महिला मंडळ व नवयुवक मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. स्व. पोकरमलजी खेतान यांना मरणोत्तर ‘अग्र विभूती’ पुरस्कार जिल्ह्याच्या उद्योग, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय योगदान देणारे स्व. पोकरमल उमाशंकर खेतान यांना यंदा अग्रवाल समाजाचा अत्यंत प्रतिष्ठेचा “अग्र विभूती’ पुरस्कार मरणोत्तर प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. बुधवार, ७ ऑक्टोबर : दुपारी ३ वाजता महिलांसाठी पाककला स्पर्धा, दुपारी ४ वाजता जुन्या दागिन्यांची रांगोळी स्पर्धा. रात्री ७ वाजता अग्रसेन भवन (जवाहरनगर) येथे नवयुवक मंडळाचा ‘आनंद मेळावा’ गुरुवार, ८ ऑक्टोबर: दुपारी २ वाजता महिला मंडळातर्फे ‘राजस्थानी मातीचे रंग, उत्सवाच्या संग’ ही भव्य नाटिका. शनिवार, १० ऑक्टोबर: सकाळी १० वा. गुणवंत विद्यार्थी सत्कार (प्रमुख अतिथी: उद्योजक सुशील खोवाल, रवी धानुका, डॉ. मनोज अग्रवाल, उद्योजक सोमेश बजाज). दुपारी ३ वा. मुलांसाठी ‘ज्युनियर मास्टर शेफ’, श्लोक व नृत्य स्पर्धा; महिलांसाठी भजनांवर आधारित नृत्य स्पर्धा. रविवार (दि. ११) सकाळी १० वा. नवयुवक मंडळातर्फे मुलांसाठी संगीत खुर्ची व चित्रकला स्पर्धा. दुपारी ३.३० वा. भव्य शोभायात्रा व सायं. ६.३० वाजता मुख्य जयंती सोहळा (पोलिस लॉन).
Source link
महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल:11 रोजी शोभायात्रा अन् मुख्य सोहळा, आयोजकांची माहिती