![]()
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, सर्वोदय मंडळ तसेच सर्व समविचारी संघटनांच्या वतीने आयोजित नशामुक्त भारत अभियान सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा नशाबंदी सप्ताह १७ ऑक्टोबर पर्यत चालणार असून या कालावधीत विविध जनजागृतीपर उपक्रमांनी राबवण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीश तराळ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील संत गाडगेबाबा अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप काळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी व्यसनमुक्त समाजनिर्मिती, युवकांमध्ये व्यसनांविषयी जनजागृती, नशेचे सामाजिक व कौटुंबिक दुष्परिणाम तसेच विवेकवादी आणि निरोगी समाजव्यवस्थेची गरज याबाबत उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले. महात्मा गांधी यांच्या विचारांना अभिवादन करताना नशामुक्तीचा संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. या अभियानात प्रफुल्ल मंदा श्रीधर, प्रतिभा खापरे, डॉ. मंदा नांदुरकर, नरेंद्र धर्माळे, संजय खापरे, सचिन वासनिक, बबिता वानखडे, साहेबराव खंडारे,नरेंद्र तायवाडे विविध समविचारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील सहकारी उपस्थित होते. यात व्यसनमुक्तीची शपथ घेऊन पत्रक वाटप करण्यात आले व पुढील कृती कार्यक्रम ठरवण्यात आले. दरम्यान नशाबंदी, व्यसनमुक्ती आणि सामाजिक प्रबोधनासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे.
Source link
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नशामुक्त भारत अभियान:सामाजिक प्रबोधनासाठी विविध उपक्रमाचे उद्घाटन