![]()
मंगळवेढा पोलिस ठाण्यात अनिता काळुंगे यांच्यावर दाखल झालेल्या खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याच्या निषेधार्थ शनिवारी मंगळवेढा शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व जाती-धर्माच्या नागरिकांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंदला व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान रात्री उशीरा आमदार समाधान आवताडे यांनी बैठक घेऊन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शनिवारी सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठा, दुकाने आणि विविध व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या प्रमुख रस्त्यांवर व बाजारपेठेत शांतता दिसून आली. अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. मंगळवेढा शहरातील विविध भागात कार्यकर्ते, युवक बंद यशस्वी करण्यासाठी सक्रिय होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन व पोलिसांकडूनही आवश्यक खबरदारी घेण्यात आली. या आंदोलनाला मंगळवेढ्यातील नागरिकांनी एकजुटीने पाठिंबा देत शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडली. शहरातील पेट्रोल पंप ,दवाखाने, बँका ,दूध डेअरी,मेडिकल ,भाजी विक्रेते वगळता सर्व आस्थापना बंद होत्या, एसटी महामंडळाच्या सर्व बसेस च्या फेऱ्या सुरळी झाल्या मात्र गर्दी अत्यंत कमी होती.
Source link
खोट्या ॲट्रॉसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत बंद:आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे