![]()
श्री गुजराती सेवा समितीच्या वतीने मुंगीलाल बाजोरिया विद्यालय परिसरात आयोजित करण्यात येणाऱ्या मुंगीलाल गरबा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. रविवार, ११ ते सोमवार, १९ ऑक्टोबरदरम्यान दररोज संध्याकाळी ७ वाजता हा गरबा महोत्सव रंगणार आहे. गरबा व माता ज
.
महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. समितीचे अध्यक्ष वालजीभाई पटेल यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली. बैठकीला अखिल भारतीय गुजराती समाजाचे महाराष्ट्र-गोवा उपाध्यक्ष हेमेंद्र राजगुरू, हरीश लाखानी, मनोज भीमजियानी, अरविंद पटेल, दीनूभाई सोनी, आशिष वखारिया, कपिल ठक्कर, प्रकाश लोढिया, किरीट शाह, अमरीश पारेख व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी हेमेंद्र राजगुरू यांनी सांगितले की, यंदा गुजरातमधील नामांकित गायक, गायिका व वाद्यवृंद महोत्सवात कला सादर करतील. पारंपरिक महिला व पुरुष गरब्यासह आकर्षक कपल गरबा रास व फॅमिली गरबा रास हे या आयोजनाचे आकर्षण ठरणार आहे. फॅमिली व कपल राससह दररोज गरबा खेळणाऱ्या युवती व महिलांनाही विविध पुरस्कारांनी गौरवले जाईल. बैठकीत महिलांची सुरक्षितता, आकर्षक विद्युत रोषणाई, विशेष सजावट, गुजराती लोकसंगीत, स्वच्छता व फूड स्टॉल आदींवर चर्चा झाली.
हरीश लाखानी यांनी सांगितले की, भाविक व नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन नवनवीन संकल्पना व प्रयोगांसह यंदाचे आयोजन केले जात आहे. महोत्सवाला प्रोत्साहन व सहकार्य देणाऱ्या विविध संस्था व प्रतिष्ठानांचा सत्कार केला जाईल. गरबा महोत्सवात अकोलेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीचे संचालन कपिल ठक्कर यांनी केले. आभार प्रदर्शन अरविंद पटेल यांनी मानले. बैठकीस विशाल शाह, पीयूष संघवी, दर्शन शाह, पराग शाह, विनोद धाबलिया, पार्थ वोरा, रोहन काटकोरिया, भारतू भाटिया, भरत मकवाना, जगदीश पटेल, संजय कोरडिया, दुष्यंत निमावत, मुकेश कोठारी, प्रफुल्ल सोनी, जयंत संघवी, शैलेश पटेल, महिला मंडळ अध्यक्षा शीतलबेन रुपारेल, अनिशाबेन वखारिया, नीलिमाबेन वोरा, नयनाबेन कारिया, नर्मदाबेन पटेल, छायाबेन लाखानी, हिनाबेन राजगुरू, अल्फाबेन पटेल, संगीताबेन भीमजियानी, रमाबेन सोनी, इंदुबेन जोशी, मनीषाबेन जोशी, गीताबेन भंडारी, प्रज्ञाबेन पंचमिया, हंसाबेन भाटिया, दर्शनाबेन भाटिया, वंदनाबेन भाटिया, नीताबेन पंड्या, उमाबेन वाघेला यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महोत्सवात सहभागी होणाऱ्या गरबाप्रेमी व नागरिकांच्या सोयीसाठी परिसरात स्वतंत्र व प्रशस्त ‘फूड झोन’ उभारण्यात येत आहे. येथे गरबा व दांडियाच्या उत्साहासोबतच नागरिकांना विविध रुचकर व स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. यासोबतच महिला व कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी विशेष स्वयंसेवक व कडेकोट व्यवस्था तैनात राहणार आहे.
गरबाप्रेमींसाठी विशेष ‘फूड झोन’ ची सोय