Headlines

पूर्णेकर हत्याकांडातील हेल्मेटमॅन अन् तरुणीमुळे गूढ वाढले:‘सुपारी किलिंग’ची शक्यता, पीआयची भूमिका संशयास्पद



ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्येचा तपास गूढ वळणावर आहे. सीसीटीव्हीत संशयित ‘टल्ली’सोबत दिसलेला अनोळखी ‘हेल्मेट मॅन’ आणि हत्येपूर्वी कार्यालयात आलेली ‘लावण्य’ यामुळे संशय वाढला आहे. अटकेतील आरोपींनाही हेल्मेट मॅनची ओळख नसल्याने, ह

.

१०० सीसीटीव्ही, ९ पथके

गुन्हे शाखेने प्रदीप शिंदे, निखिल यादव, नितेश पवारला अटक केली असून ८ ऑक्टोबरपर्यंत त्यांना कोठडी सुनावली आहे. १०० सीसीटीव्ही फुटेज तपासून ९ पथके या गुन्ह्याचा समांतर तपास करत आहेत.

‘माफी’चा बहाणा की रेकी?

लावण्यने माफीच्या बहाण्याने येऊन मारेकऱ्यांना ‘टीप’ दिल्याच्या संशयावरून तिची चौकशी झाली. माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचीही चौकशी शक्य आहे. सुषमा अंधारेंनी पोलिसांवर प्रश्नचिन्ह उठवले, तर सत्ताधाऱ्यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली.

कटाचा नवा अँगल

  • हेल्मेट मॅन : टल्लीसोबतच्या व्यक्तीने हेल्मेट न काढल्याने पाळतीसाठी तिसऱ्या टोळीचा वापर झाल्याची शक्यता.
  • फरार टल्ली : मुख्य संशयित संतोष कनोजिया अद्याप पोलिसांना गुंगारा देत आहे.
  • टीपिंग : लावण्यने मारेकऱ्यांना कार्यालयाची माहिती पुरवली का, याचा तांत्रिक तपास सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *