![]()
नागपूर-वर्धा मार्गावरील जामठा परिसरातील गवसी-मानापूर गावाजवळ एका भरधाव ट्रेलरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. या अपघातात पती, पत्नी आणि त्यांच्या 4 वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांचा सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चालकाचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश नाईक, त्यांची पत्नी सुनिता योगेश नाईक आणि दोन मुले, दुचाकीने नागपूर शहरातून बुट्टीबोरीकडे जात होते. शनिवारी रात्री 7 वाजताच्या सुमारास वर्धा मार्गावरील जामठा परिसरातील गवसी-मानापूर गावाजवळ आले असता, मागून भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. जखमी मुलावर नागपुरात उपचार सुरू या भीषण अपघातात योगेश नाईक, पत्नी सुनिता आणि चार वर्षांचा मुलगा गुलशन उर्फ गोलू योगेश नाईक यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा दुसरा 6 वर्षांचा मुलगा तन्मय हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच हिंगण्याचे ठाणेदार प्रमोद घोंगे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी मुलास तातडीने उपचारासाठी नागपूरच्या एम्स रुग्णालयात दाखल केले. काही काळ वाहतूक ठप्प या अपघातामुळे नागपूर-वर्धा मार्गावर काही वेळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि एका बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघातानंतर आरोपी ट्रेलर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, ठाणेदार प्रमोद घोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. हे ही वृत्त वाचा बायकोची पोत गहाण ठेवूनही कर्ज संपेना:बुलढाण्यात हताश शेतकऱ्याने घेतला फास, चिठ्ठीत मांडली दुष्काळाची भीषणता; महसूलमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी घटना
“वावर विकून कर्ज फिटले नाही, बायकोची पोत गहाण ठेवूनही पाहिजे तितके पैसे भेटले नाहीत…” अशी हृदयद्रावक चिठ्ठी लिहून चोंडी टाकळेश्वर (ता. संग्रामपूर) येथील अल्पभूधारक शेतकरी शंकर रामभाऊ भारसाकळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी, 3 ऑक्टोबर रोजी ही सुन्न करणारी घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यातील दुष्काळी पाहणी दौऱ्यापूर्वीच हा प्रकार समोर आल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. वाचा सविस्तर
Source link