![]()
पैठण शहरात एसटी बस आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन तिघे जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. रविवारी (४ ऑक्टोबर) दुपारी तिन वाजेच्या दरम्यान भीषण अपघात घडला. अशोक भालेराव (रा. नांदर, ता. पैठण) आणि कृष्णा गायकवाड (रा. जालना) अशी मृतांची नावे आहेत. कृष्णा गायकवाड यांच्या दोन वर्षांच्या चिमुकलीचाही या अपघातात मृत्यू झाला. दोघेही साडू असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा गायकवाड आणि अशोक भालेराव हे मोटारसायकल (एमएच २० जेए २९७९) वरून पैठण येथे आले होते. नाथांच्या दर्शनानंतर कपडे घेऊन ते परत जात असताना संकेत दुकानासमोर त्यांच्या मोटारसायकलची एसटी बस (एमएच ०६ बीडब्ल्यू ४३६९) सोबत समोरासमोर धडक झाली. धडक एवढी भीषण होती की दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत गायकवाड यांच्या दोन वर्षांच्या चिमुकलीचाही मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे नांदर आणि जालना परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Source link
एसटी बस-मोटारसायकलची समोरासमोर धडक:चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू, पैठण शहरातील भीषण अपघात