Headlines

खेळाडूंच्या नोकरी आरक्षणात मोठा फेरबदल:‘क्रीडा ई-प्रमाण’ व ब्लॉकचेन तंत्रज्ञान लागू, कोणते खेळ ठरणार पात्र?




राज्य शासनाने क्रीडा क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या खेळाडूंवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रांतील नोकऱ्यांमध्ये खेळाडूंसाठी लागू असलेल्या ५% समांतर आरक्षणाच्या धोरणात मोठा सुधारित बदल करण्यात आला आहे. क्रीडा प्रमाणपत्रांमधील बोगसगिरीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी शासनाने ‘क्रीडा ई-प्रमाण’ ऑनलाइन प्रणाली आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान बंधनकारक केले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील नवीन शासन निर्णय जारी केला असून, यापूर्वीचे खेळाडू आरक्षणाशी संबंधित सर्व शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत. ‘क्रीडा ई-प्रमाण’ या पद्धतीने कार्य करणार पोर्टलवर लॉग-इन: खेळाडूने आपल्या आधार-संलग्न आयडीद्वारे पोर्टलवर अर्ज करावा. स्वयंचलित पडताळणी: संघटनेने ब्लॉकचेनवर जतन केलेल्या माहितीशी अर्ज जुळल्यास अवघ्या ७ दिवसांत ऑनलाईन पडताळणी अहवाल मिळेल. क्यूआर कोड स्कॅनिंग: महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा भरती प्राधिकरण क्यूआर कोड स्कॅन करून प्रमाणपत्राची सत्यता क्षणात तपासू शकेल.
क्यूआर कोड स्कॅन करून प्रमाणपत्राची सत्यता क्षणात तपासू शकणार कोणते खेळ ठरणार पात्र? २००५ नंतर सलग तीन ऑलिम्पिक खेळांमध्ये समाविष्ट असलेले खेळ आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय खेळ – कबड्डी, खो-खो, बुद्धिबळ, मल्लखांब आणि क्रिकेट यांना ५% आरक्षणाचा लाभ मिळेल. संशयास्पद प्रकरणात चाचणी : क्रीडा प्रमाणपत्राबाबत गंभीर तक्रार किंवा संशय असल्यास विशेष समितीद्वारे उमेदवाराची प्रत्यक्ष क्रीडा कौशल्य चाचणी व प्रात्यक्षिके होतील.
वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट: पात्र खेळाडूंना शासकीय नोकरीसाठी विहित वयोमर्यादेत ५ वर्षांपर्यंत सूट देण्यात आली आहे (कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे आणि दिव्यांगांसाठी ४५ वर्षे). काय आहेत महत्त्वाचे बदल बोगस प्रमाणपत्रांना चाप: खेळाडू उमेदवारांना शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना केवळ ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीद्वारे निर्गमित केलेले ऑनलाइन प्रमाणपत्रच लागेल. संघटनांना ३० दिवस: स्पर्धा झाल्यानंतर क्रीडा संघटनांना ३० दिवसांच्या आत अंतिम निकाल व खेळाडूंची माहिती पोर्टलवर अपलोड करावी लागेल. माहिती अपलोड न करणाऱ्या संघटनांना स्वयंचलितरीत्या ‘डिफॉल्टर’ यादीत टाकले जाईल. जुन्या खेळाडूंना ३ महिने मुदत: ज्या खेळाडूंनी यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने प्रमाणपत्र पडताळणी केली आहे, त्यांना ३ महिन्यांच्या आत पडताळणी बंधनकारक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *