Headlines

दिव्य मराठी एक्स्पोज:नाशिकमध्ये रसायनयुक्त पाणी माणसांसह गर्भांनाही हानिकारक, ‘प्रेग्नन्सी टाळा’ उपचार घेणाऱ्यांना डॉक्टरांचा सल्ला




अंबड आैद्याेगिक वसाहतीत जमिनीत झिरपलेले रसायनयुक्त पाणी नागरिकांच्या आराेग्यास धाेकादायक ठरत आहे. येथील मुलांना घरी राहण्याचा सल्ला शाळेतून दिला जाताे आहे, तर उपचार सुरू असलेल्या महिलांना गर्भधारणा टाळण्याचा सल्ला डाॅक्टर देत आहेत. विशेष म्हणजे सात दिवसांपासून उद‌्भवलेल्या या समस्येवर कडक कारवाई करण्यात प्रदूषण नियंत्रण महामंडळालाही अपयश आले आहे. दत्तनगरमधील १५ हजारांची लाेकवस्ती बाेअरच्या पाण्यावर अवलंबून आहे. गेल्या दाेन महिन्यांपासून येथे रसायनयुक्त पाणीपुरवठा हाेताे आहे. यामुळे स्थानिकांना गंभीर स्वरूपाचे त्वचाविकार झाले आहेत. गेल्या महिनाभरापासून स्थानिक ५ हजारांचे स्वच्छ पाणी विकत घेत आहेत, तर झालेल्या विकारांवर उपचार करण्यासाठी ५ हजारांचा खर्च हाेत आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने येथे केवळ एकाच कंपनीला नाेटीस बजावण्याचे साेपस्कार पार पाडले, मात्र परिसरात अजूनही रसायनयुक्त पाणी येण्याचे प्रकार सुरूच आहेत. एका कंपनीला नोटीस तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. किती कंपन्यांतून रसायन मिसळले जाते हे स्पष्ट नाही. एका कंपनीला नोटीस बजावली. – प्रणव पाखले, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ औषधांसाठी पाच हजार या समस्येमुळे आम्ही दर महिन्याला ५ हजारांचे स्वच्छ पाणी खरेदी करताे. उपचारासाठी ५ हजारांची औषधेही खरेदी करावी लागत आहेत. – पीडित महिला संसर्ग टाळण्यासाठी घरी राहण्याचा सल्ला नाशिकला अंबड, दत्तनगर परिसरातील महिलांच्या त्वचेवर दूषित पाण्यामुळे असे त्वचाविकार झाले आहेत. यातून सुटका नसल्याने अनेकांनी बदलले घर प्रदूषण नियंत्रण महामंडळाने चाैकशी सुरू केली तरीही रसायनयुक्त पाणी बाेअरवेलमधून येत आहे. यातून सुटका हाेत नसल्याने अनेकांनी दुसरीकडे घर घेतले आहे. अंघाेळीसाठी काही नातलगांकडे जातात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *