![]()
शहरातील जुने बसस्थानक परिसरात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांना लक्ष्य करत तब्बल २ लाख रुपयांची रोकड लंपास केली. दोन्ही चोरीच्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. जुने बसस्थानक परिसरात निसार पठाण यांचे कपड्यांचे मोठे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री सुमारे बाराच्या सुमारास दुकान बंद करून निसार पठाण घरी गेले होते. त्यानंतर मध्यरात्री दोन चोरटे जुने बसस्थानक परिसरात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद : चोरीच्या दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी केलेली हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेषतः सना मेडिकलमध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये चोरटे स्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याधारे चोरट्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे.
Source link
खुलताबादेत दोन दुकानांमध्ये चोरी:कुलूप तोडून 2 लाख रुपये, पळवले कपड्याच्या दुकानातून 1 लाख 60 हजार, मेडिकलमधून ४० हजार लंपास