![]()
सततची नापिकी आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या केळगाव येथील ३६ वर्षीय शेतकऱ्याने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गणेश साहेबराव कोल्हे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे केळगाव परिसरात शोककळा पसरली आहे. गणेश कोल्हे यांनी रविवारी रात्री सुमारे १२ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार त्यांच्या पत्नीच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून शेजारी घटनास्थळी धावून आले. नागरिकांनी गणेश यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
Source link
सिल्लोड:कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या