![]()
वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावानजीक कुलभूषण महाविद्यालयासमोर वैजापूरकडे पोकलेन घेऊन जाणाऱ्या ट्रकचे समोरील टायर फुटल्याने ट्रकची दुचाकीला धडक बसली. यात एक जण ठार तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे वैजापूर येथून शिऊर येथील महाविद्यालयात मुलीला घेऊन जात असताना राष्ट्रीय महामार्ग ७५२ वरील खंडाळा येथून जवळच असलेल्या कुलभूषण महाविद्यालयासमोर ट्रक (एमएच १६ ए इ ७६३९) चे टायर फुटल्याने ट्रकने दुचाकी (एमएच २० बी झेड ९२२१) ला जोरात धडक दिली. दुचाकीने शिऊर येथे जात असलेले दत्तात्रय शांतीलाल महाले (४१) ठार झाले, तर मुलगी ऋतुजा महाले (१६) पायाल फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी झाली. त्यांना बाळासाहेब जानराव व रिक्षाचालक अमीन शेख यांनी उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे दाखल केले दत्तात्रेय महाले हे मुंबईहून ४ ऑक्टोबर रोजी वैजापूर येथे भावाकडे आले होते. ५ ऑक्टोबर रोजी पितृपक्ष असल्याने ते वैजापूर येथे आले होते. मुलीला कॉलेजला सोडून येतो म्हणून ते शिऊरला मोटरसायकलवर निघाले होते. खंडाळा गावाजवळ अपघात होऊन दत्तात्रय महाले ठार झाले. मात्र, वैजापूर पोलिस स्टेशनला सात वाजेपर्यंत गुन्हा दाखल नव्हता.
Source link
ट्रक-दुचाकीच्या अपघातात वडील ठार, तर मुलगी गंभीर:खंडाळा येथील घटना, ट्रकचे टायर फुटल्याने अनर्थ