![]()
हिंगोली शहरातील कपडागल्ली परिसरात अनधिकृतपणे साठवून ठेवलेल्या फटाक्यांच्या गोदामाला सोमवारी (५ ऑक्टोबर) रात्री सव्वाआठच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला असून, अग्निशमन दलाच्या जवानांसह १० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर हिंगोलीतील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना लातूर, छत्रपती संभाजीनगरला हलवले आगीत जखमी झालेल्या नागरिकांपैकी सहा जणांना पुढील उपचारांसाठी लातूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. आग विझवताना अग्निशमन दलाच्या तीन जवानांनाही दुखापत झाली. त्यामुळे या दुर्घटनेनंतर शहरात चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार संतोष बांगर यांच्याकडून मदतकार्य दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर, युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत मदत आणि बचावकार्य सुरू ठेवण्यात आले. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यात आली. गंभीर जखमींना लातूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यासाठीही पुढाकार घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. पालकमंत्र्यांनी दखल घेतली नसल्याचा आरोप मात्र, एवढी मोठी दुर्घटना घडूनही हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी घटनास्थळी किंवा रुग्णालयात भेट दिली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पालकमंत्र्यांनी या घटनेची साधी दखलही घेतली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. ‘एवढी मोठी घटना घडूनही पालकमंत्री कुठे आहेत?’ हिंगोलीतील नागरिक मिलिंद उबाळे यांनी या घटनेनंतर पालकमंत्र्यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. शहरात एवढी मोठी दुर्घटना घडली असून नागरिक जखमी झाले, काहींचा मृत्यू झाला, तरी पालकमंत्र्यांकडून तत्काळ दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले. दुर्घटनेनंतर प्रशासनाने जखमींना तातडीने मदत आणि योग्य उपचार मिळवून देण्याबरोबरच अशा अनधिकृत फटाका साठवणुकीवरही कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. हेही वाचा.. हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, 2 ठार:7 जण भाजले, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू हिंगोली शहरातील कपडागल्ली परिसरात फटाक्यांच्या गोदामाला सोमवारी (5 ऑक्टोबर) रात्री पावणेआठच्या सुमारास भीषण आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा साठा असल्याने आगीसोबत जोरदार स्फोट होऊ लागले. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण भाजल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी हिंगोलीतील लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आग विझविताना फटाक्यांच्या स्फोटामुळे अग्निशमन दलाचे वाहनही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सविस्तर वाचा
Source link
हिंगोलीत भीषण आग, दोघांचा मृत्यू:पालकमंत्री कुठे आहेत? नागरिकांचा संतप्त सवाल