Headlines

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीला आता माघारीचा रंग:162 अर्ज वैध, 10 उमेदवारांचे अर्ज बाद




सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता निवडणुकीच्या रणधुमाळीला माघारीच्या टप्प्याचे वेध लागले आहेत. छाननीत एकूण 162 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून 10 उमेदवारांचे अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील प्रमुख राजकीय गटांमधील दिग्गज उमेदवारांची उमेदवारी कायम राहिली आहे. आता माघारीच्या कालावधीत कोण उमेदवारी मागे घेणार आणि कोण बंडाचे निशाण कायम ठेवणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था मतदारसंघात छाननीनंतर अनेक प्रमुख उमेदवार रिंगणात कायम आहेत. यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले, ज्ञानदेव रांजणे, उदयसिंह विलासराव पाटील, सत्यजित पाटणकर, प्रभाकर देवबा घार्गे, इंदिरा प्रभाकर घार्गे, शेखर गोरे, जयकुमार गोरे, नितीन लक्ष्मणराव भरगुडे-पाटील आणि नितीन लक्ष्मणराव जाधव यांचा समावेश आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. फलटणमध्ये नाईक-निंबाळकर कुटुंबाची उमेदवारी कायम फलटण मतदारसंघात रामराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि समशेर हिंदूराव नाईक-निंबाळकर यांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे फलटण मतदारसंघातील राजकीय समीकरणांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. माघारीनंतर या मतदारसंघातील अंतिम लढतीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. उदयनराजेंचा अर्जही वैध गृहनिर्माण व दूध उत्पादक संस्था, वराहपालन, मेंढीपालन मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर कोंडीबा पवार आणि सोमनाथ रामचंद्र धुमाळ यांचीही उमेदवारी कायम आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीकडे जिल्ह्याचे विशेष लक्ष लागले आहे. महिला राखीव मतदारसंघात सुरभी मदन भोसले, अनुपमा शाहूराज फाळके, प्रीती प्रभाकर घार्गे, सुनेत्रा राजेंद्र शिंदे, कांचन सतीश साळुंखे, अल्पना प्रताप यादव आणि सोनाली मनोज पोळ यांचे अर्ज वैध ठरले आहेत. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातही पाच उमेदवारांची उमेदवारी कायम आहे. विविध राखीव मतदारसंघांतही चुरस इतर मागास प्रवर्गातून शंकर रामचंद्र माळवदे, शेखर भगवानराव गोरे, अशोक राजाराम मोरे, कांचन सतीश साळुंखे आणि लक्ष्मण उत्तमराव कडव हे उमेदवार रिंगणात आहेत. विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय मतदारसंघात शिवाजीराव शंकरराव शेळके, सुनील सुरेश वाघ, कांताबाई रामभाऊ ढेकळे, तात्यासाहेब आबाजी धायगुडे, शंकर गुजाबा माडकर आणि निशांत अरविंद गवळी यांची उमेदवारी कायम आहे. कृषी पणन व शेतीमाल प्रक्रिया मतदारसंघात मकरंद लक्ष्मणराव पाटील आणि विश्वासराव निंबाळकर यांचे अर्ज वैध ठरले आहेत. 10 अर्ज विविध कारणांनी बाद छाननीदरम्यान आवश्यक कागदपत्रे नसणे, संस्था संचालक नसणे, थकबाकी असणे तसेच संचालक मंडळाची यादी सादर न करणे आदी कारणांमुळे 10 उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. यामध्ये बाळकृष्ण किसन माळी यांचा जातीचा दाखला नसल्याने, दिपाली यशवंत साळुंखे यांचा समिती सदस्यांची यादी नसल्याने, तर सचिन तुकाराम माळी यांचा थकबाकी असल्याने अर्ज बाद झाला. तसेच लवराज गणपती जाधव, भीमदेव बाबा बुरुंगले आणि पराग शंकर रामू गडे यांचे अर्ज संबंधित संचालक मंडळाची यादी नसल्याने बाद करण्यात आले. रामचंद्र नाथा ढेकळे आणि कांताबाई ढेकळे हे संस्था संचालक नसल्याचे आढळल्याने त्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले. जगदीश जगताप आणि दीपक ननावरे यांचे अर्ज थकबाकी असल्याच्या कारणावरून बाद झाले. माघारीतच खरी राजकीय कसोटी छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी निवडणुकीचे अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही उमेदवारांच्या अर्जांवर सूचक-अनुमोदक तसेच अन्य तांत्रिक कारणांवर आक्षेप घेण्यात आले होते. मात्र, संबंधित उमेदवारांचे इतर मतदारसंघांतील अर्ज वैध ठरल्याने त्यांना निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता अर्ज माघारीच्या टप्प्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील खरे राजकीय डावपेच रंगणार आहेत. एकाच गटातील अनेक उमेदवार रिंगणात राहिल्यास मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाराजांची मनधरणी, बंडखोरांना थोपविणे, उमेदवारांची जुळवाजुळव आणि मतदारसंघनिहाय तडजोडी यांना वेग येणार आहे. प्रमुख राजकीय नेत्यांसाठीही माघारीचा टप्पा निर्णायक ठरणार असून, कोण कोणाची मनधरणी करण्यात यशस्वी ठरते, यावर अनेक मतदारसंघांतील लढतीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. हेही वाचा… आरोग्य विभागाचा मोठा निर्णय:जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या 3 वर्षांच्या कामगिरीचे 100 गुणांत मूल्यमापन, गुणवत्ताधारित पदस्थापनेचा मार्ग मोकळा सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हास्तरीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून गुणवत्ताधारित पदस्थापना देण्याचे धोरण निश्चित केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या मागील 3 वर्षांच्या कामगिरीचे 100 गुणांच्या निकषांवर मूल्यमापन केले जाणार आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनात ‘परफॉर्मन्स-बेस्ड पोस्टिंग’ची नवी कार्यपद्धती लागू होणार आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *