![]()
दिंडोरी-वणी राज्यमार्गावर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत लखमापूर येथील कामगाराचा जागीच मृत्यू झाला. शिवदत्त सुखदेव शिंदे (रा. लखमापूर) असे मृताचे नाव असून, ते लखमापूर येथील कंपनीत कार्यरत होते. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक संतोष छगन कडाळे यांच्याविरोधात दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवदत्त शिंदे हे दुचाकी (एमएच १५ जेजे ८५४५) वरून जात असताना कडाळे कार (एमएच १५ ईएक्स ९६६९) घेऊन समोरून येत होते. ओव्हरटेक करण्याच्या नादात कडाळे यांची कार विरुद्ध बाजूला जाऊन शिंदे यांच्या दुचाकीला धडकली. गंभीर दुखापत झाल्याने शिंदे यांचा मृत्यू झाला. कडाळे हेही जखमी झाले आहेत. मृताचे भाऊ संदीप सुखदेव शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दिंडोरी पोलिस करीत आहेत.
Source link
पोलिस उपनिरीक्षकाच्या कारची धडक; दुचाकीस्वार जागीच ठार:दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल; उपनिरीक्षक जखमी