Headlines

'बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही':पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत अर्धा तास केवळ राज्याच्या दुष्काळावर चर्चा केली- एकनाथ शिंदे




सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परभणीमध्ये शिवसेनेच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांना सायकल आणि शिलाई मशीनचे वाटप केल्यानंतर केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. याचवेळी त्यांनी मोदींसोबत नुकत्याच झालेल्या भेटीचा खुलासा करताना सांगितले की, पंतप्रधानांनी त्यांना भेटीसाठी एक तासाचा वेळ दिला होता आणि त्यापैकी तब्बल अर्धा तास त्यांनी केवळ महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. आपल्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले, दुष्काळाच्या या परिस्थितीत सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असून शेतकाऱ्यांनो खचून जाऊ नका. सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी आम्हाला माहिती आहेत. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. मला देखील जाणीव आहे. हा एकनाथ शिंदे शेतकऱ्यांचा पुत्र आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. पंतप्रधान देखील म्हणाले की, शिंदे तुम्ही चिंता करू नका. केंद्र सरकार देखील आपल्या पाठीशी उभा आहे. जेव्हा कधी शेतकऱ्यांवर संकट आले तेव्हा सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिले आहे. आम्ही गेल्यावर्षीही अतिवृष्टी झाली तेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलो होतो. मागच्या वेळी बळीराजाची दिवाळी काळी होऊ दिली नाही. या वर्षीही होऊ देणार नाहीह, अशी ग्वाही शिंदेंनी दिली आहे. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, खचून न जाता आपल्या परिवारचा विचार करा. टोकाचा निर्णय घेऊ नका. बँकवाल्यांना थांबवू. शेतकऱ्यांसाठी बारा कलमी कार्यक्रम राबवत आहोत. शेतकऱ्यांचे संकट जिथे आहे तिथे सरकार आणि शिवसेना आहे. आता शिवसेनेने 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असे काही धोरण ठेवलेले नाही. तर 100 टक्के समाजकारण आहे, असेही शिंदे म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *