Headlines

रेणुका मातेच्या दर्शनासाठी पाच लाख भाविक येणार:मंदिर रात्री 1 पर्यंत खुले, दर्शन रांगेसाठी बॅरीगेटिंग, बसण्यासाठी ठिकठिकाणी बाके‎


.

रेणुका देवीच्या नवरात्रोत्सवास रविवार (दि. ११) पासून प्रारंभ होत आहे. ट्रस्टच्या वतीने उत्सवाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती व्यवस्थापक मधुकर पवार व सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली. शारदीय नवरात्रोत्सव कालावधीत सुमारे पाच लाख भाविक श्री रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याची शक्यता आहे.

यावर्षी भाविकांचे दर्शन सुलभ, लवकर व्हावे व भाविकांची गैरसोय होऊ नये, ऊन-पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी १७ हजार स्क्वेअर फूट आकाराचा वॉटरप्रूफ मंडप मंदिराच्या आवारात उभारण्यात आला आहे. या मंडपात सुलभ दर्शन रांगेसाठी बॅरीगेटिंग, बसण्यासाठी ठिकठिकाणी बाके व स्तनदा मातांसाठी दोन हिरकणी कक्षांची व्यवस्था करण्यात येत आहे. या दर्शनमंडपात एकावेळी सुमारे दोन ते अडीच हजार भाविक दर्शनरांगेत राहू शकतील.

भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनच्या वतीने नवरात्रोत्सवात विविध सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी मंदिराच्या माथ्याजवळील प्रवेशद्वाराजवळ उर्वरित पान २

यात्रोत्सव काळात भाविकांसाठी पिण्याचे पाणी, विजेचे मोठे लाईट, सुलभ शौचालय, आरोग्यविषयक सुविधा, ठिकठिकाणी भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र नळ आदी विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. उत्सवकाळात सुमारे ५०० महिला घटी बसण्याचा अंदाज असून, त्यासाठी स्वतंत्र सहा सभागृहांत व्यवस्था केली आहे.

भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर आवारात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पार्किंग, मनोरंजन साधने येथे अतिरीक्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याद्वारे गर्दीवर नियंत्रण ठेवले जाईल. मंदिराच्या गाभाऱ्यात वायरलेस सिक्युरिटी अलार्म बसविला आहे.

{उपजिल्हा रुग्णालय, मंगरुळ सोमा टोल व शिवसेना शिंदे गट यांच्या रुग्णवाहिका {मुख्य दरवाजाजवळ पोलिस मदत केंद्र {परिसरात मंगरुळ सोमा टोलची क्रेन, अग्नीशमन सेवा {शिवसेनेच्या वतीने १७ हजार चौ. फुटाचा दर्शनरांग डोम, मोफत आरोग्य शिबिर, हिरकणी कक्ष, खिचडीवाटप व दहा दिवस पाणीवाटप {भाविकांसाठी मोठा सभामंडप, भक्त निवास, स्त्री-पुरुष स्वच्छतागृह, ४० सौरऊर्जा पथदीप, घट बसण्यासाठी स्वतंत्र हॉल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *