![]()
विभागीय क्रीडा संकुल येथे नुकत्याच पार पडलेल्या मनपा अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश क्रीडा स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या गटात जैन इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी तन्वी जोगदंड हिने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. या यशामुळे तन्वीची आगामी विभागीय शालेय स्क्वॉश क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत तन्वीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पदकाला गवसणी घातली. तिच्या या कामगिरीमुळे शाळेच्या तसेच कुटुंबाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. स्पर्धेनंतर क्रीडा अधिकारी खंडू यादवराव यांच्या हस्ते तन्वीला कांस्यपदक प्रदान करून तिचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. रोहित गाडेकर, डॉ. कैलास शिवनगर, श्याम अंभोरे आणि अनिल जोगदंड यांची उपस्थिती होती. तन्वीच्या यशाबद्दल जैन इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका शिखा श्रीवास्तवा यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीनेही तन्वीचा सत्कार करण्यात आला. आगामी विभागीय स्पर्धेतही तिने उत्कृष्ट कामगिरी करावी, यासाठी उपस्थितांनी तिला शुभेच्छा दिल्या.
Source link
तन्वी जोगदंडला स्क्वॉशमध्ये कांस्यपदक:विभागीय स्पर्धेसाठी निवड