![]()
महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथ निवड समितीने २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम आणि दर्जेदार ग्रंथांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत नांदेड येथील ‘इसाप प्रकाशना’च्या ७ पुस्तकांची निवड झाली असून स्थानिक साहित्यिक वर्तुळातून आनंदाचे वातावरण व्यक्त होत आहे. वाचकांना आय. एस. बी. एन. (ISBN) नोंदणीकृत, सकारात्मक विचारांची पेरणी करणारी आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारी उत्कृष्ट साहित्यकृती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या ग्रंथांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेली पुस्तके आणि लेखक/लेखिका: शासकीय ग्रंथ निवडीत स्थान मिळाल्याबद्दल निवड झालेल्या सर्व लेखकांनी आनंद व्यक्त केला आहे. या यशाबद्दल इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे, अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य देवीदास फुलारी, माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, डॉ. पृथ्वीराज तौर, गटशिक्षणाधिकारी सुधीर गुठे, दिगंबर क्षीरसागर, राम तरटे, आनंद पुपलवाड, पंडित पाटील, विजयकुमार चित्तरवाड, अरुण अतनुरे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक व वाचकांनी सर्व लेखकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
Source link
ग्रंथ वार्ता:शासकीय ग्रंथ निवडीत नांदेडच्या 'इसाप प्रकाशना'ची 7 पुस्तके; शंकर वाडेवाले, व्यंकटेश चौधरींसह लेखकांचा सन्मान