“केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी लोकशाही आणि संविधानाची उघड पायमल्ली करून भाजपला सोयीची ठरेल अशी व्यवस्था निर्माण केली आहे. स्वतःच्या दोन सहकारी निवडणूक आयुक्तांनी आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या मनमान
.
नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी केंद्रीय निवडणूक आयोगातील कथित सावळागोंधळ, ‘एसआयआर’ (SIR) प्रकरणावरून दिल्लीत सुरू असलेले इंडिया आघाडीचे आंदोलन, सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील संशयास्पद मतदान आणि भंडाऱ्यातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्येवरून केंद्र व राज्य सरकारवर चौफेर तोफ डागली.
मुख्य न्यायाधीशांना पॅनेलमधून का काढले?
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर बोट ठेवत नाना पटोले म्हणाले, “महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 वाजल्यानंतर जे अचानक संशयास्पद मतदान वाढले, त्यासंदर्भात आम्ही आयोगाकडे अधिकृत सीसीटीव्ही फुटेजची (CCTV Footage) मागणी केली होती. फडणवीस सरकारमध्ये जराही दम आणि प्रामाणिकपणा असेल, तर त्यांनी ते फुटेज जनतेसमोर आणावे. नियम बदलून रात्री 12 वाजेपर्यंत बूथवर काय चालले होते, हे पाहण्याचा संविधानाने दिलेला अधिकार मतदारांना का नाकारला जातोय?”

मुख्य न्यायाधीशांना वगळल्याचे उत्तर द्या
“निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती पॅनेलमधून देशाच्या सरन्यायाधीशांना (CJI) वगळण्यासाठी मोदी सरकारने कायदा का बदलला? निवडणूक आयोग पारदर्शक राहावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाची यंत्रणा हवी होती; मात्र भाजपच्या सोयीने निकाल लावण्यासाठीच आयोगावर संपूर्ण ताबा मिळवण्यात आला आहे.”
आयोगाच्या दोन सहकाऱ्यांचेच आक्षेप
“आम्ही हवेत आरोप करत नाही आहोत. स्वतः ज्ञानेश कुमारांच्या सोबत काम करणाऱ्या दोन सहकाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ‘फॉर्म 6’ मधील परस्पर बदल आणि एकतर्फी निर्णयांवर लेखी आक्षेप नोंदवले आहेत. मग या मनमानी कारभारावर भाजपचे नेते तोंड का उघडत नाहीत?”
‘इंडिया’ आघाडीचा दिल्लीत सलग चौथा दिवस
दिल्लीतील संसदेपासून सुरू असलेल्या विरोधी पक्षांच्या देशव्यापी आंदोलनाची माहिती देताना त्यांनी सांगितले. “आमचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीच्या रक्षणासाठी शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांना वंचित ठेवण्याचा कट आम्ही हाणून पाडू. या संदर्भात कालच राष्ट्रपतींना पत्र लिहून वेळ मागितली असून, ‘इंडिया’ आघाडीचे 10 प्रमुख खासदार आज राष्ट्रपतींची भेट घेऊन परिस्थितीची वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घालणार आहेत.”
माजी न्यायाधीशांच्या पत्रावर टीका
“निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ पुढे करण्यात आलेली 42 माजी न्यायाधीशांची यादी म्हणजे भाजपचा पूर्वनियोजित ‘पॉलिटिकल स्टंट’ आहे. विद्यमान सर्वोच्च न्यायालय ज्यावेळी एसआयआर आणि फॉर्म 6च्या बदलांवर ताशेरे ओढत आहे, त्यावेळी एका खोट्यासाठी 100 खोट्या गोष्टी पसरवून आपल्या पापांवर पडदा टाकण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.”
भंडाऱ्यात शेतकऱ्याची आत्महत्या; पालकमंत्री आणि तहसीलदारांवर गुन्हा नोंदवा
विदर्भातील भीषण दुष्काळ आणि भंडाऱ्यातील ताज्या शेतकरी आत्महत्येचा उल्लेख करताना नाना पटोले अत्यंत भावुक व आक्रमक झाले. “भंडारा जिल्ह्यातील रवींद्र सपाटे या धान उत्पादक शेतकऱ्याने कर्जाच्या विळख्याला कंटाळून नुकतीच आत्महत्या केली. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी हा शेतकरी प्रत्यक्ष पालकमंत्र्यांना भेटला होता. डोळ्यांत पाणी आणून त्याने आपली व्यथा मांडली होती. मात्र, पालकमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने त्याचे कोणतेही समाधान केले नाही. यामुळेच हताश होऊन त्याने टोकाचे पाऊल उचलले. या मृत्यूला जबाबदार असणारे पालकमंत्री आणि संबंधित तहसीलदारांवर तात्काळ एफआयआर (FIR) दाखल करून निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.”
कर्जमाफीचा निव्वळ दिखावा आणि मीडिया ट्रायल
“सरकार कर्जमाफीचा मोठा गाजावाजा करत आहे; मात्र हा फक्त ‘मीडिया ट्रायल’ आणि प्रसिद्धीचा फार्स आहे. परवाच अन्न व नागरी पुरवठामंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका ऑनलाइन बैठकीत सत्ताधारी भाजपच्याच आमदारांनी वस्तुस्थिती उघड केली. एका तालुक्यात अवघ्या 5 ते 10 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून 90 टक्के शेतकरी वंचित आहेत. जनतेत तोंड दाखवणे कठीण झाल्याची कबुली खुद्द भाजप आमदारांनी दिली आहे.”
जनतेची मते नकोत, कारण आयोग पाठीशी; या बेशर्म सरकारला जनताच उत्तर देईल
सरकारच्या एकंदर कार्यपद्धतीवर प्रहार करताना पटोले म्हणाले, “हे सरकार जनतेच्या मतांनी नव्हे, तर निवडणूक आयोगाच्या कृपेने सत्तेवर आलेले सरकार आहे. म्हणूनच त्यांना सामान्य शेतकऱ्यांचे अश्रू, सुशिक्षित बेरोजगारांचे हाल आणि महागाईशी काहीही देणेघेणे उरलेले नाही. यांना जनतेच्या मतांची गरजच वाटत नाही, इतकी सत्तेची मस्ती डोक्यात गेली आहे.”
आरपारची लढाई लढणार
“शेतकऱ्यांना आत्महत्येच्या खाईत लोटणाऱ्या या जाड कातडीच्या आणि बेशर्म सरकारविरोधात आता काँग्रेस आरपारची रस्त्यावरची लढाई लढेल. शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आम्ही आमच्या खास भाषेत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा नाना पटोले यांनी शेवटी दिला.
——————————————————-
हेही वाचा…
सोयीनुसार रंग बदलणे म्हणजे काँग्रेसचे राजकारण: ज्या राज्यांत मित्रपक्षांची सत्ता, तिथे काँग्रेसचा पत्ता कट, त्यावर राहुल गांधी गप्प का?- रविंद्र चव्हाण

सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण! ज्या राज्यांमध्ये तब्बल 40-40 वर्षे काँग्रेसचा एकही मुख्यमंत्री होऊ शकला नाही, तिथे त्यांच्याच मित्रपक्षांची सत्ता होती. मात्र, व्होट चोरीचा आरोप करणारे राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतर नेते या वास्तवावर तोंडातून ‘ब्र’ देखील काढणार नाहीत. ‘चोराच्या उलट्या बोंबा’ म्हणतात ते नेमके हेच आहे असे म्हणत भाप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी