![]()
देशात निवडणूक आयोगाच्या कारभारावरून विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एसआयआर प्रक्रियेत घोळ करून निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला मदत करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून केला जात आहे. या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांकडून केली जात आहे. या मुद्द्यावरून गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. यादीतील मतदारांची नावे गेली कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी यावेळी बोलताना आकडेवारी देखील सांगितली. ते म्हणाले, गोलमाल ग्यानुचा पहिला गोलमाल सांगतो. 7 लाख 90 हजारांची आकड्यात गोलमाल आहे. मे मध्ये एक आकडा निवडणुक आयोगाने दिला तर ऑगस्टमध्ये वेगळाच आकडा दिला. हे मतदार गेले कुठे हे गोलमाल ग्यानुने सांगावं. 5 लाख मतदार गेले कुठे हे त्यांनी सांगावं, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, भिवंडी मतदार संघात 3 लाखाहुन अधिक मतदार आहेत. SIR आणि मतदार यादीचा ताळमेळ बसत नाही. मग ते मतदार गेले कुठे? एवढी तफावत झाली कशी? माहीम मतदार संघात एक बूथ असा आहे की 2002 च्या SIR मध्ये नाव आहे. त्यांनी 2002 पासून ते मतदान करतात, पण निवडणुक आयोगाच्या ड्राफ्ट रोलमध्ये नाव असताना देखील त्यांना आता नोटीस गेल्या आहेत. हा काय प्रकार आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच अनेक ठिकाणी BLO घरी गेले असतील असं वाटत नाही. अनेक ठिकाणी तर BLO जायचे आणि आजूबाजूवाल्यांना बोलवून घेतले तिथे काम केले. आमच मुख्य टार्गेट हे गोलमाल ग्यानु आहे त्यांना हटवावं लागेल. आता ही लढाई रस्त्यावरची आहे. आताची स्थिती आणीबाणीची परिस्थिती आहे. गोवा, राजस्थान येथून अनेक ट्रेनमध्ये मुलांना उचलल जातंय. परिस्थिती अशी आहे की 2029 च्या अगोदर सरकार बदलेलं.
Source link
‘मतदारांची नावे गेली कुठे?’:आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR प्रक्रियेतील आकडेवारीवर उपस्थित केले प्रश्न