![]()
अमरावतीत उद्या, ११ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सव आणि अंबादेवी यात्रा सुरू होत आहे. याच दिवशी घटस्थापना केली जाईल. जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यात सुमारे २५०० ठिकाणी सार्वजनिक दुर्गा प्रतिष्ठापना केली जाईल. आज दिवसभर ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत मानाच्या मूर्ती मंडपांकडे नेण्यात आल्या. शहरभर रोषणाई आणि भगवे झेंडे लावले आहेत. यात्रेमुळे आज १० ते २० ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीत बदल आहे. राजकमल चौक ते अंबागेट मार्ग फक्त पादचाऱ्यांसाठी असेल. साबनपुरा खिडकी ते गांधी चौक आणि मंदिर परिसरातील रस्ते वाहनांसाठी बंद राहतील. जड मालवाहतूक वाहनांना काही रस्त्यांवर प्रवेश बंद आहे. भक्तांसाठी नेहरू मैदान, ओसवाल भवन, मुधोळकर पेठ मैदानावर पार्किंगची सोय आहे. आपत्कालीन सेवांना या नियमातून वगळले आहे.
Source link
अमरावतीत उद्यापासून नवरात्रोत्सव आणि अंबादेवी यात्रा सुरू:जिल्ह्यात 2500 ठिकाणी दुर्गा प्रतिष्ठापना; दहा दिवस भरणार यात्रा