Headlines

तुळजापूरहून देवीची ज्योत नेणाऱ्या चाैघांना कंटेनरने चिरडले; तीन ठार:मृत संभाजीनगर जिल्ह्याचे रहिवासी; पिंपळगाव पांढरीतील घटना



बीड-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव पांढरी (ता. छत्रपती संभाजीनगर) परिसरात तुळजापूरहून देवीची ज्योत पायी घेऊन गोळेगाव व जाफ्राबादवाडी (ता. खुलताबाद) येथे जाणाऱ्या चार तरुणांना भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना शनिवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमार

.

मिळालेल्या माहितीनुसार, गोळेगाव व जाफ्राबादवाडी (ता. खुलताबाद) येथील भाविक श्रीक्षेत्र तुळजापूर येथून देवीची ज्योत घेऊन पायी येत होते. तेलपुरवठा करणारे दोघे दुचाकी (एमएच २० सीएएस ८०७४) वरून सोबत चालले होते. मागून येणाऱ्या अज्ञात कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की कंटेनरने दुचाकीला तब्बल ५ किलोमीटरपर्यंत घासत नेले.

या अपघातात अक्षय राजपूत (रा. जाफ्राबादवाडी, ता. खुलताबाद) याचा जागीच मृत्यू झाला. तो काटशेवरी फाटा येथे गॅरेज चालवत होता. अमोल औटे व गोरख म्हसकर (दोघेही रा. गोळेगाव, ता. खुलताबाद) यांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. शुभम आधाने गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी करमाड पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

घटनास्थळावरून कंटेनरचालक पसार

घटना घडल्यानंतर चालकाने कंटेनरसह पोबारा केला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिस फरार कंटेनरचा शोध घेत आहेत. नवरात्रोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे खुलताबाद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *