Headlines

पुण्यातील एसईझेडमधून दीड लाख कोटींची निर्यात पार:सिप्झ-एसईझेड पुणे क्लस्टरच्या संयुक्त विकास आयुक्त मितल हिरेमठ यांची माहिती; चर्चासत्रात मार्गदर्शन




पुण्यातील विशेष आर्थिक क्षेत्रात ( एसईझेड) कार्यरत असणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून मधून दीड लाख कोटींच्या निर्यातीचा टप्पा पार पडला असल्याची माहिती एसईझेड पुणे क्लस्टरच्या संयुक्त विकास आयुक्त मितल हिरेमठ यांनी शनिवारी दिली. शिखाज् कारीगरी’ आणि केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे भारताच्या विविध राज्यांमधील कला, हस्तकला, वस्त्रोद्योग, फॅशन आणि जीवनशैलीचा समृद्ध वारसा एकाच छताखाली आणणाऱ्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत – फॅशन अँड लाइफस्टाइल एक्स्पो २०२६’ या उपक्रमाच्या निमित्ताने ” एसईझेड आणि निर्यातविषयक संधी” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मितल हिरेमठ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुण्यामध्ये हिंजवडी, खराडी अशा विविध भागामध्ये २२ विशेष आर्थिक क्षेत्र कार्यरत आहेत. त्या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापासून ते फार्मा, अभियांत्रिकी असे विविध क्षेत्रातील उद्योग कार्यरत असून ते उत्तम काम करत आहेत. त्यामुळेच पुण्यातून दीड लाख कोटींचा निर्यातीचा टप्पा पूर्ण झाला असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. विशेष आर्थिक क्षेत्रात येणाऱ्या उद्योगांना सरकारकडून विशेष सवलती देण्यात येतात त्यामध्ये प्रामुख्याने करामध्ये सवलत, जीसीएसटीमध्ये सूट अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. इथे येणाऱ्या उद्योगांना आवश्यक असणाऱ्या सुविधा एका छताखाली देण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे अनेक उदयॊग त्याचा लाभ घेत आहेत. लहान उदयॊगाना प्रोत्साहन देण्यासाठी एसईझेड उपयुक्त ठरणारे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. विशेष आर्थिक क्षेत्रात येणाऱ्या उद्योगांच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होत आहे. आपल्याकडून वाढत असणाऱ्या निर्यातीमुळे आयातीवर आपल्याला कमी प्रमाणात अवलंबून रहावे लागत आहे. इथे येणाऱ्या उद्योगांना सरकार प्रोत्साहन देत आहे, त्यांना योग्य ती संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढे येत आहे. भविष्यकाळात अधिकाधिक उद्योगांनी इथे येऊन व्यवसाय पुढे नेले तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी त्याची मदत होणार असल्याचे मितल हिरेमठ यावेळी म्हणाल्या. केंद्र सरकारने विशेष आर्थिक क्षेत्राची यॊजना २००५ पासून सुरु केलेली आहे. इथे लहान उदयॊग देखील येऊ शकतात. इथे येण्याचे अनेक फायदे आहेत. कर सवलतींच्या बरोबरच सरकारकडून अनेक प्रकारचे सहकार्य उदयॊगाना मिळते, त्यामुळे अधिकाधिक उदयॊगानी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या उदयॊजकांच्या शंकांचे त्यांनी निरसन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *